आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before Maturity Policy Closing There Is Two Option

मॅच्युरिटीपूर्वी पॉलिसी बंद करण्याचे दोन पर्याय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एलआयसी तसेच खासगी विमा कंपन्यांच्या पारंपरिक योजनेच्या पॉलिसी घेणा-या बहुतेकांना त्यातून मुदतीपूर्वी बाहेर पडण्याच्या अटींबाबत फारशी माहिती नसते. मुदतीपूर्वी पॉलिसी बंद करण्याची वेळ आली तर आपण जेवढा प्रीमियम भरला आहे, तेवढा व्याजासकट परत मिळेल अशी त्यांची धारणा असते. मात्र, हाती कमी पैसे पडल्यानंतर त्यांना धक्का बसतो. पारंपरिक आयुर्विमाधारकाकडे आणखी एक पर्याय आहे, तो पॉलिसी पेडअप करू शकतो. जर किमान तीन वर्षे हप्ते भरले असतील तर हा पर्याय पॉलिसी सरेंडरपेक्षा अधिक उत्तम आहे. या दोन्ही पर्यायांत फरक आहे. तो काय हे समजून घेऊ...

पॉलिसी सरेंडर करणे....
पॉलिसीची भविष्यातील मॅच्युरिटी व्हॅल्यू घटवून आजच्या व्हॅल्यूप्रमाणे करणे याला पॉलिसी सरेंडर असे म्हणतात. पॉलिसीचे मूल्य 20 वर्षांनंतर पाच लाख रुपये असेल आणि ती आता बंद करायची असेल, तर कंपनी सध्याच्या हिशेबाने त्याचे नेट वर्तमान मूल्य देईल. परंपरागत विमा पॉलिसींबाबत किमान सातत्याने तीन ते पाच वर्षे प्रीमियम भरल्यानंतर त्या पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू तयार होते. पॉलिसी सुरू केल्यानंतर तीन ते पाच वर्षांच्या आत प्रीमियम भरणे बंद केल्यास काहीच मिळणार नाही.

तीन ते पाच वर्षे अखंडितपणे हप्ते भरल्यास एकूण भरण्यात आलेल्या प्रीमियमच्या रकमेतून काही रकमेची सरेंडर व्हॅल्यू तयार होईल. कारण यात पहिल्या वर्षीच्या प्रीमियमच्या रकमेचा समावेश नसतो. म्हणजेच, जर तुम्ही पाच लाखांची 20 वर्षे मुदतीची आयुर्विमा पॉलिसी घेतली आणि त्याचा वार्षिक हप्ता 25 हजार रुपये आहे. पाच वर्षांत सव्वा लाख रुपये प्रीमियम भरल्यानंतर, पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला पहिल्या वर्षीचा प्रीमियम वगळता, उर्वरित चार वर्षांच्या प्रीमियमच्या 30 ते 40 टक्के रक्कम मिळेल. म्हणजेच तुमच्या हाती 30 ते 40 हजार रुपये पडतील. जर पॉलिसीला पाच वर्षे झाली असतील तर बोनसही घटून मिळेल.

पॉलिसी पेडअप करणे ..
पॉलिसीला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ती पुढे चालू ठेवण्याची पॉलिसीधारकाची इच्छा नाही. तसेच पैसे परत घेण्याचीही घाई नाही. अशा स्थितीत पॉलिसी पेडअप करणे योग्य ठरते. या पर्यायात प्रीमियम पुढे भरावा लागत नाही आणि पॉलिसीही सुरू राहते. मॅच्युरिटीच्या वेळी भरलेला प्रीमियम आणि त्यावरील बोनस अशी रक्कम मिळते.
अशा प्रकारे पॉलिसी सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी सरेंडर मूल्य मिळते, हा समज चुकीचा आहे. जर पॉलिसी बंदच करायची असेल तर ती पेडअप करण्याची मानसिकता ठेवा. पॉलिसी मुदतीपूर्वी बंद करण्याची खूपच निकड असेल तरच सरेंडरचा पर्याय निवडावा.

लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि द फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे
सदस्य आहेत.
suresh.narula@dainikbhaskargroup.com