आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन विमा महागला इर्डाने दिली मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एक एप्रिलपासून वाहन विमा महागला आहे. वाहन विम्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी -इर्डा) कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स (सीआयआय) ९.०५ टक्क्यांनी वाढल्याने हा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मधील ९३९ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये सीआयआय १०२४ वर पोहोचल्याने वाहनांच्या थर्ड पार्टी प्रीमियममध्ये वाढीला इर्डाने मंजुरी दिली आहे.
इर्डाच्या अधिसूचनेनुसार, तीन वर्षांनंतर खासगी कारच्या थर्ड पार्टी प्रीमियममध्ये वाढ करण्यात आली आहे. इर्डाने जरी थर्ड पार्टी प्रीमियम वाढीला मंजुरी दिली असली तरी विमा कंपन्यांना याचा फारसा फायदा होईल असे नाही. कारण सध्याच्या स्थितीत विमा कंपन्यांना आपल्या उत्पादनानुसार विमा प्रीमियम निश्चित करण्याचे स्वातंत्र्य आहे.

थर्ड पार्टी प्रीमियम

वाहन पूर्वी आता
खासगी वाहन (रक्कम रु.)
१००० सीसीपर्यंत ७८४ १४६८
१००१ ते १५०० सीसी ९२५ १५९८
१५०० सीसीपेक्षा जास्त २८५३ ४९३१

दुचाकी वाहने
१५० ते ३५० सीसी ३५० ५५४
३५० सीसीपेक्षा जास्त ६८० ८८४