आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - भारतीय आयुर्विमा नियंत्रक प्राधिकरण अर्थात ‘इर्डा’ने मोटार विम्यावरील प्रीमियममध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने योग्य पाऊल उचलले असले तरी मोटार अपघात विम्यातील तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने ही वाढ फारच तुटपुंजी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
मोटार विम्यावरील प्रीमियममध्ये सर्वाधिक वाढ करण्याचा प्रस्ताव मसुद्यात नमूद केला आहे, परंतु या प्रस्तावित पातळीनुसार प्रीमियममध्ये वाढ केली तरी ती अपुरी आहे. त्याचप्रमाणे अपघात आणि दाव्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेतले तरीही तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने सध्याची वाढदेखील फारच कमी असल्याचे मत जनरल इन्शुरन्स कौन्सिलचे महासचिव आर. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले.
प्रीमियममध्ये वाढ होऊनदेखील पुढील आर्थिक वर्षातल्या अंडररायटिंग तोट्याचा विचार केला तरी मोठा फरक पडतो. भारतीय आयुर्विमा नियामक प्राधिकरणाने मोटार विम्यावरील प्रीमियममध्ये सरासरी 20 टक्क्यांनी वाढ जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे, परंतु फेब्रुवारीमध्ये तयार करण्यात आलेल्या मसुद्यातील प्रस्तावित वाढीच्या तुलनेत ही वाढ कमी असल्याचे मत सर्वसाधारण विमा उद्योगाने व्यक्त केले.
मोटार विमा विभागातील प्रीमियमच्या रकमेत वाढ करण्याच्या दृष्टीने कौन्सिल नियामक त्याचप्रमाणे सरकारकडे यापुढेही प्रयत्न करेल, असेही चंद्रशेखरन म्हणाले. भारती अक्सा जनरल इन्शुरन्सने प्रीमियम वाढ हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असल्याचे म्हटले आहे. सर्वसाधारण विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका मोठ्या सार्वजनिक कंपनीच्या अन्य एका अधिका-याने नवीन प्रीमियम दरातील वाढीचा भार लवकरच ग्राहकांच्या खांद्यावर टाकण्यात येणार असल्याचे सांगितले.
मोटार विमा विभागातील अंडररायटिंग तोट्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने सध्या सर्वसाधारण विमा उद्योगातील अनेक कंपन्यांना फटका बसत आहे. कारण दाव्यांच्या तुलनेत देण्यात येणारी प्रीमियमची रक्कम फारच अपुरी आहे.
पुढे काय ?
वाहन विम्यात आणखी वाढ झाल्यास सर्वात मोठा परिणाम वाहन विक्रीवर होईल. वाहनांची मागणी कमी होईल. वाहन विम्यात 10 टक्के वाढ झाल्यास एक लाखाच्या प्रीमियममागे 35 ते 40 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.