आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विमा क्लेम फेटाळण्याची कारणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आरोग्य विमा कंपनी क्लेम फेटाळण्याची अनेक कारणे आहेत. काही वेळा याची कारणे योग्य असतात. कारण क्लेममध्ये दर्शवण्यात आलेले आजाराचे कारण पॉलिसीच्या कक्षेबाहेरचे असते. आरोग्य विम्याबाबतीत अशी कारणे तसेच अटींना एक्सक्लुजन असे म्हणतात. अशाच एक्सक्लुजनविषयी पॉलिसीधारकांना माहिती असणे आवश्यक आहे. त्याविषयी...
* आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी असलेले आजार सर्वसाधारणपणे पॉलिसी खरेदीच्या वेळी कक्षेबाहेर असतात. अशा प्रकारच्या आजारांना विमा कंपन्या संरक्षणासाठी तीने ते चार वर्षांचा प्रतीक्षा कालावधी ठेवतात. या कालावधीनंतरच अशा प्रकारच्या आजारांसाठी क्लेम करता येतो. मात्र, प्रतीक्षा कालावधीत आरोग्य विमा पॉलिसी चालू स्थितीत असावी.
काही विशिष्ट आजार, विकार पॉलिसीनंतर दोन वर्षे कक्षेबाहेर असतात. त्याच्या उपचारावर झालेला खर्च एक निश्चित मुदत पूर्ण झाल्यानंतरच क्लेमयोग्य ठरतो. मोतीबिंदू, हार्निया, जन्मजात असलेले विकार, फिस्टुला (भगंदर),पाइल्स (मूळव्याध), सायनस, मुतखडा, सांधे प्रत्यारोपण तसेच वयोमानानुसार होणारे ऑस्टियोर्थरायटस यांसारखे आजार यांचा यात समावेश आहे.
*परकीय आक्रमण तसेच युद्धासारख्या प्रसंगात झालेल्या जखमा किंवा आजारावरील उपचारांचा खर्च यांना आरोग्य विमा पॉलिसीत संरक्षण नसते.
* कॉस्मेटिक सर्जरी, चश्मे, होमिओपॅथी, आयुर्वेदिक उपचार, नॅचरोपॅथी आदींवर झालेला खर्च आरोग्य विम्यात संगक्षित नसतो. आता काही कंपन्यांनी यापैकी काही पद्धतींना संरक्षण देणे सुरू केले आहे.
* जखमांसाठी तसेच आजारासाठी घेण्यात येणा-या उपचारार्थ व्हिटॅमिन तसेच टॉनिकवर झालेल्या खर्चाचा आरोग्य विमा पॉलिसीत समावेश नसतो.
* रुग्णालयाकडून आकारण्यात आलेला सेवा कर, अधिभार (सरचार्ज), अ‍ॅडमिशन फी तसेच नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन चार्ज) आदी विमा कंपनी रिइम्बर्समेंट करत नाही.
* डेंटल केअर, हिअरिंग आणि व्हिजन केअर यांच्यातील बहुतांश हिस्सा विम्यात संरक्षित नसतो कारण यात रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसते. आरोग्य विम्यात रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या खर्चाचा प्रमुख्याने समावेश असतो.
* एचआयव्ही पॉझिटिव्ह किंवा एड्स आणि दारू / ड्रग्ज यांच्या उपचारात झालेला खर्च आरोग्य विमा पॉलिसीत समाविष्ट नसतो.
रुग्णालयात दाखल होण्याची अनेक कारणे असतात. त्यामुळे आरोग्य विम्यातील अटी तसेच एक्सक्लुजनबाबत माहिती असणे गरजेचे आहे. यामुळे ऐनवेळी उद्भवणा-या अडचणींपासून सुटका होते.
लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि द फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.

suresh.narula@dainikbhaskargroup.com