आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमडब्ल्यूपी अ‍ॅक्टअंतर्गत उतरवा पत्नी-मुलांचा विमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एखाद्याने आयुर्विमा उतरवला असेल आणि विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपन्या विम्याची रक्कम विमाधारकाच्या कुटुंबाला देते. कर्जदारास क्लेमच्या रकमेतून त्याची रक्कम फेडून घेण्याचा अधिकार असतो. अशा परिस्थितीत आपल्या मृत्यूनंतर कुटुंबास आर्थिक सुरक्षितता देणे ही विवाहित पुरुषाची जबाबदारी आहे. यात आयुर्विमा पॉलिसी महत्त्वाची ठरू शकते. मात्र, ही पॉलिसी विवाहित महिला संपत्ती कायदा- 1874 (एमडब्ल्यू अ‍ॅक्ट) अंतर्गत खरेदी करायला हवी. या कायद्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊ...
*फायदे काय : या कायद्याच्या कलम सहानुसार एखाद्या विवाहित पुरुषाने आपल्या आयुर्विमा पॉलिसीत पत्नी / मुलांना लाभार्थी घोषित केल्यास क्लेमची रक्कम लाभार्थींना देणे विमा कंपनीसाठी बंधनकारक असते. मात्र, एकदा लाभार्थी नमूद केल्यास त्यात बदल करता येत नाही. या कायद्यान्वये खरेदी केलेली विमा पॉलिसी मृत पतीचा संपत्ती हिस्सा ठरू शकत नाही. त्यामुळे क्लेमच्या रकमेतून थकबाकी वसुली करण्याचे अधिकार कर्जदात्याला राहत नाहीत. न्यायालय हे या संपत्तीला जप्त करू शकत नाही. लाभार्थी तसेच प्रौढ लाभार्थीच्या अनुमतीशिवाय अशी पॉलिसी सरेंडर करता येत नाही.
*कोणाला मिळू शकते ही पॉलिसी : जम्मू-काश्मीर वगळता देशातील सर्व राज्यांतील रहिवासी या कायद्यांतर्गत विमा पॉलिसी खरेदी करू शकतात.
*कोण खरेदी करू शकते : विवाहित पुरुष, विधुर किंवा घटस्फोटित पुरुष या कायद्यांतर्गत पत्नी तसेच मुलांच्या हितासाठी विमा पॉलिसी खरेदी करू शकतात.
*लाभार्थी कोण होऊ शकतात : 1. फक्त पत्नी 2. फक्त एक किंवा एकापेक्षा अधिक अपत्ये, 3. पत्नी आणि एक किंवा एकापेक्षा अधिक अपत्ये.
*अपॉइंटमेंट ऑफ ट्रस्टी : या कायद्यांतर्गत पॉलिसी खरेदी करायची असेल तर एक किंवा दोन व्यक्तींना विश्वस्त म्हणून नेमणे आवश्यक असते. यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती तसेच एखादा कॉर्पोरेट ट्रस्टी म्हणून नेमता येतो. एखादी बँक किंवा कंपनीही विश्वस्त ठरू शकते.
*क्लेम मिळवणे : क्लेमची रक्कम पत्नी/ मुलांच्याच हाती पडते की नाही हे पाहणे हे ट्रस्टीच्या नेमणुकीमागचे कारण आहे. त्यामुळे विमाधारकाच्या मृत्यूनंतर क्लेमची रक्कम फक्त ट्रस्टी किंवा ट्रस्टच्याच हाती पडते. लाभार्थी सज्ञान असेल तर ट्रस्टी क्लेमची रक्कम त्यांच्याकडे देतात. लाभार्थी अज्ञान असेल तर ट्रस्टी क्लेमची रक्कम स्वत:कडे सुरक्षितपणे ठेवतात.
*पॉलिसीवर कर्ज : पत्नी तसेच मुलांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्यान्वये काढण्यात आलेल्या विमा पॉलिसीवर कर्ज मिळत नाही. ट्रस्टीला विशेष माहिती देऊन या पॉलिसीवर कर्ज मिळवता येते.
एमडब्ल्यूपी अ‍ॅक्टचा लाभ घ्यायचा असेल तर पॉलिसीच्या प्रस्ताव अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र जोडावे लागते. प्रत्येक प्लॅनसाठी ही सुविधा लागू होत नाही. विवाहित पुरुषच याचा वापर करू शकतात.


लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि द फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.
uttam.sen@dainikbhaskargroup.com