आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट चांगले ठेवा, विम्यात सूट मिळवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - क्रेडिट रेटिंग एजन्सीची नजर आता बँकेच्या कर्जदारांसह विमा पॉलिसी खरेदी करण्यावरही राहणार आहे. देशातील सर्वात मोठी क्रेडिट रेटिंग एजन्सी सिबिलने आता त्या दृष्टीने तयारी केली आहे. यामुळे विमा कंपन्यांना पॉलिसीधारकांच्या क्रयशक्तीचा अंदाजही येईल तसेच प्रीमियमवर सूट देण्याचा निर्णयही घेता येईल.

सिबिलचे मुख्य संचालक अरुण ठकराल यांनी सांगितले, विमा नियामक व नियंत्रक इर्डासह विमा कंपन्यांशी ग्राहकांच्या डाटा जमवण्यासंबंधी आमची चर्चा सुरू आहे. यामुळे कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाची किंमत ठरवणे तसेच ग्राहकांकडून किती पी्रमियम आकारावा हे निश्चित करणे सोपे होईल. जर एखाद्या ग्राहकाचे क्रेडिट रेकॉर्ड उत्तम असेल तर त्याला प्रीमियममध्ये 10 ते 30 टक्के सवलत मिळण्याची शक्यता आहे. जर एखाद्या ग्राहकाची डिफॉल्ट टक्केवारी अधिक असेल तर त्याला उच्च प्रीमियमची पॉलिसी देण्यात येईल. सर्वप्रथम हे सर्वसाधारण (जनरल) विम्यासाठी लागू होईल. सध्या तरी आयुर्विम्याचा यात समावेश नसल्याचे ठकराल यांनी स्पष्ट केले.