आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्विमा प्रपोजल फॉर्म काळजीपूर्वक भरा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपण सर्व जण आयुर्विमा किंवा आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करतो. यात टर्म प्लॅन, युलिप, एंडोव्हमेंट आदी पॉलिसींचा समावेश असतो. जानेवारी ते मार्च या काळात अनेक जण कर बचतीचे पर्याय शोधत असतात. याच काळात विमा एजंटही अनेकांशी सातत्याने संपर्क साधत असतात. या घाईच्या काळात अनेक जण पॉलिसीचा प्रपोजल फॉर्म भरण्याचे काम एजंटाकडेच सोपवतात. एजंटाचे आपल्या कमिशनवर अधिक लक्ष असू शकते. कोणत्याही परिस्थितीत प्रपोजल रद्द होऊ नये तसेच प्रीमियमचा आकडा वाढू नये याची काळजी एजंट घेत असतात. पॉलिसी लवकरात लवकर मिळावी यासाठी ब-या च वेळा को-या प्रपोजल फॉर्मवर सह्या घेतल्या जातात. अशा वेळी प्रपोजल फॉर्ममध्ये चुका होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रपोजल फॉर्म भरताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे, हे जाणून घेऊ...
1. विमा पॉलिसी फॉर्म स्वत: भरा : अनेकांना लांबलचक फॉर्म भरणे कंटाळवाणे वाटते. जर फॉर्म स्वत: भरला तर त्यातील छोट्या -मोठ्या बाबी समजतील. त्यामुळे क्लेम घेतेवेळी आपल्या कुटुंबीयांना त्रास होणार नाही.
2. चुकीची माहिती भरू नका : ब-याचदा प्रीमियम वाचवण्याच्या नादात विमा ग्राहक प्रपोजल फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरतात. मात्र, ही माहिती कंपनीच्या जास्त जोखमीच्या व्यक्तींच्या सूचीत येऊ शकते. अशा स्थितीत कंपनी आपला क्लेम रद्द करू शकते. जर पॉलिसीशी संबंधित कागदपत्रांत चुकीची माहिती दिली असेल तर कंपनीशी संपर्क साधून त्यात खरी माहिती द्यावी.
3. पॉलिसी घेताना स्पष्टीकरण देणे हे तर कर्तव्य : कायद्यानुसार खरी माहिती कंपनीला देणे हे पॉलिसीधारकाचे कर्तव्य आहे. प्रपोजल फॉर्मद्वारे कंपनी अनेक प्रश्नांतून आपल्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असते. अशा वेळी केवळ विचारलेल्या प्रश्नांबाबतच नव्हे, तर इतर प्रासंगिक माहितीही द्यायला हवी.
4. आपल्या जुन्या विमा पॉलिसींबाबत माहिती द्यावी : जर आपल्याकडे एखादी एंडोव्हमेंट, मनी बॅक पॉलिसी, युलिप, टर्म प्लॅन किंवा कोणत्याही प्रकारची आरोग्य विमा पॉलिसी असेल तर त्याची माहिती नवी पॉलिसी घेताना देणे आवश्यक आहे. सर्व पॉलिसींविषयी माहिती द्यावी.
कोणत्याही व्यक्तीला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आयुर्विमा देण्यात येतो. जर आपण जुन्या पॉलिसींविषयी माहिती दिली नाही आणि क्लेमच्या वेळी आपला विमा मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे माहिती झाल्यास क्लेम रद्द होऊ शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा.

लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि द फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे
सदस्य आहेत.


suresh.narula@dainikbhaskargroup.com