आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Guidelines For Non life Insurance Cos' Ipo In 1 Week: Irda ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमा कंपन्यांसाठी आयपीओ नियमावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्वसाधारण विमा कंपन्यांचा भांडवल बाजारातील प्रवेश सुकर करण्यासाठी नियमावली तयार आहे. या कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीसाठी लवकरच नियमावली जाहीर करण्याचे संकेत भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (इर्डा) अध्यक्ष जे. हरी नारायण यांनी दिली
‘सीआयआय’ने आयोजित केलेल्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भांडवल बाजार नियंत्रक सेबीने बिगर विमा कंपन्यांसाठीच्या आयपीओ मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्याला या अगोदरच मान्यता दिलेली आहे. विमा कंपन्यांच्या भांडवल बाजारातील नोंदणीची अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जवळपास वर्षभराने जाहीर करण्यात आली; परंतु विमा व्यवसायात कार्यरत असलेल्या 10 कंपन्यांपैकी एकही कंपनी सार्वजनिक समभाग विक्रीपात्र नसून त्यांची अद्याप बाजारात नोंदणी झालेली नाही.
समभाग बाजापेठेत स्थानिक निधीचा ओघ वाढावा यासाठी विमा नियामक प्राधिकरण सर्व आयुर्विमा कंपन्यांच्या गुंतवणूक मर्यादेत वाढ करण्याचाही विचार करीत आहे. सध्या एका नोंदणीकृत कंपनीतील गुंतवणूक मर्यादा ही 10 टक्के आहे; परंतु आता भारतीय आयुर्विमा महामंडळासह सर्व विमा कंपन्यांच्या गुंतवणूक मर्यादेत वाढ करण्याचा विचार असल्याचे इर्डाचे पूर्णवेळ संचालक सुधीन रॉय चौधरी यांनी या वेळी सांगितले.
विमा व्यवसायात कार्यरत असलेल्या कंपन्यंकडे मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त निधी असला तरी त्यासाठी असलेली 10 टक्के गुंतवणूक मर्यादा ही अगदीच तोकडी आहे. त्यामुळे विमा कंपन्यांसाठी असलेल्या गुंतवणूकविषयक नियमात शिथिलता आणावी, अशी विनंती आयुर्विमा महामंडळाने इर्डाकडे केली होती.
भांडवल बाजारात ब-याच कालावधीपासून मरगळ आली आहे. विमा कंपन्यांच्या गुंतवणूक मर्यादेत वाढ केल्यास भारतीय समभागांमध्ये स्थानिक गुंतवणूक होऊन भांडवल बाजाराला बळकटी मिळेल, असा यामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.