आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Married Then Get Discount In Insurance Premium

PHOTOS: विवाहित असाल तर भरा कमी प्रीमियम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमा कंपन्या विम्याचा हप्ता (प्रीमियम) ठरवताना तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक माहितीसोबत वैवाहिक स्थितीची विशेष माहिती घेत आहेत. तुम्ही जर डॉक्टर, इंजिनिअर असाल, तुमच्याकडे बंदिस्त पार्किंग असेल आणि तुमचा गाडीचा वापर योग्य पद्धतीने होत असल्यास वाहन विम्याचे नूतनीकरण करताना घसघशीत सूट मिळू शकते. वाहन विमा प्रकारात मोठे नुकसान झाल्याने विमा कंपन्या नुकसान टाळण्यासाठी नवे नवे पर्याय स्वीकारत आहेत. याचाच भाग म्हणून एकाच पॉलिसीसाठी वेगवेगळ्या रकमांचा पर्याय पुढे आणला जात आहे. यानुसार विमा दाव्यांची संख्या वाढल्यास हप्ता वाढणार आणि दाव्यांची संख्या कमी राहणार असल्यास कमी हप्त्याचा पर्याय निवडता येईल.

वाहनाचा विमा हप्ता ठरवताना कंपन्या इंजिन क्षमता, गाडीचे आयुष्य आणि गाडीचा वापर यांसारख्या गोष्टींकडे लक्ष देत होत्या; पण गेल्या चार वर्षांत विमा कंपन्यांनी यात आणखी काही महत्त्वाच्या तरतुदी जोडल्या आहेत. (उदा. वाहनात कोणते इंधन वापरले जाते, वाहनात चोरी प्रतिबंध उपकरणे लावली आहेत काय?) विमा कंपन्या वाहनाचा विमा हप्ता ठरवताना आता वय, व्यवसायासोबत वैवाहिक स्थितीचीसुद्धा माहिती घेत आहेत, असे जाणकारांचे मत आहे. वैवाहिक स्थितीचा हप्त्यावर प्रभाव पडतो, असे त्यांचे मत आहे. (उदा. वाहन खरेदी करणारा विवाहित असून त्याचे वय 32 ते 60 च्या दरम्यान असल्यास हप्त्यात मोठी सूट मिळू शकते.) लग्न झालेला व्यक्ती जास्त जबाबदारीने वागत असतो. त्यामुळे गाडी चालवताना तो खबरदारी घेत असतो. म्हणून हप्त्यात त्याला ऑफर दिली जाते.