आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Installment 15 Percent Cheap Due To Dmat Insurance Policy

डिमॅट विमा पॉलिसीमुळे हप्ता १५ टक्के स्वस्त, डिजिटल आयुर्विमा पॉलिसीसाठी इर्डाचे नवे नियम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयुर्विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्यास यापुढे विमाधारकाला हप्त्यात १० ते १५ टक्के सवलत मिळणार आहे. विमा नियामक प्राधिकरणाने (इर्डा) कोशागार (रिपॉझिटरी) व डिमटेरिलायझेशनबाबतच्या नियमावलीत बदल केल्याने हा फायदा मिळणार आहे.विमा कंपन्यांना डिमॅट स्वरूप देण्यासाठी इर्डाने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार विमाधारकाला आयुर्विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रिपॉझिटरीकडे ठेवता येईल. त्यामुळे विमाधारकांचा हप्ता १० ते १५ टक्क्यांनी कमी होणार आहे.
ग्राहकांचा फायदा
आयुर्विमा पॉलिसी डिमॅट स्वरूपात असल्याने त्याची कागदपत्रे, हाताळणी, जपणूक आदींवरील खर्चात बचत होईल. त्यामुळे हप्ता १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल.
विमा कंपन्यांना लाभ
*कोट्यवधी ग्राहकांच्या पॉलिसीची कागदपत्रे सांभाळणे, हप्त्याची नोंद ठेवणे, पाठपुरावा करणे या कामातून कंपन्यांची सुटका होईल.
*योजनेनिहाय विविध पॉलिसी छापणे, त्याची शहानिशा करणे, त्या पोस्ट, कुरिअरने ग्राहकांना पाठवणे, यासाठीच्या खर्चात बचत होईल.