आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा व्यवसाय पाच वर्षांत एक लाख कोटींवर जाण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील आरोग्य विमा व्यवसाय २५ ते ३० टक्क्यांच्या दराने वाढत असून पुढील चार ते पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे. विमा नियामक आयआरडीएचे अध्यक्ष टी. एस. विजयन यांनी गुरुवारी हा अंदाज व्यक्त केला. उद्योग संघटना फिक्कीच्या वतीने आरोग्य विम्यावर आयोजित एका संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यात आपण भविष्यवाणी करत नसून देशातील विमा व्यवसाय ज्या पद्धतीने वाढत आहे त्यानुसार पुढील चार ते पाच वर्षांत हा व्यवसाय एक लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
सध्याच्या स्थितीत फक्त आठ टक्के लोकसंख्या आरोग्य विमा संरक्षणाच्या अंतर्गत आली असून जवळपास १५ टक्के विविध सरकारी योजनेअंतर्गत आरोग्य विम्याचा लाभ घेत असल्याचे विजयन यांनी सांगितले. विमा कंपन्यांना व्यवहार वाढवायचा असल्यास त्यांना ग्राहकांच्या बेसला आठवरून २५ वर न्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कंपन्यांनी असे केले नाही तर मासिक हप्ता वाढेल आणि विम्यामध्ये समाविष्ट होत असलेले आजार आणि सेवा यांच्यात घट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

प्रीमियम आणि उपचार नागरिकांच्या आवाक्यात असेल तर सरकारी कराप्रमाणेच आरोग्य विमा घेणे अनिवार्य करता येऊ शकते. ज्या पद्धतीने सरकारी सेवांचा कोणी वापर करो अथवा न करो, त्यांना सेवेसाठी कर भरावाच लागतो. त्याच पद्धतीने आरोग्य विमा भरणे अनिवार्य करता येऊ शकते, असे मत विजयन यांनी मांडले. विमा क्षेत्रात एफडीआयची मर्यादा २६ वरून ४९ टक्के करणे हा सकारात्मक निर्णय असल्याचे विजयन यांनी सांगितले. यामुळे पैसा येणार असल्याचे ते म्हणाले.
ग्राहकांशी संपर्क महत्त्वाचा
दवाखान्याचे बिल वेळेत मिळावे अशी ग्राहकांची अपेक्षा असल्याचे विजयन यांनी सांगितले. त्यामुळे विमा कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. कंपन्यांचा ग्राहकांशी संपर्क तुटला तर आरोग्य विमा उद्योगात घसरण येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
इतर वक्त्यांनी मांडलेले मुद्दे
{ आरोग्य विम्यासाठी मासिक/ तिमाही/ सहामाही प्रीमियम भरण्याची मुभा असायला हवी.
{ ओपीडी विभागात होणाऱ्या उपचाराचा खर्चदेखील आरोग्य विम्यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे.
{ कंपन्यांनी आरोग्य विम्यात करण्यात आलेला दावा कमी प्रमाणात किंवा पूर्णपणे रद्द करण्यासाठी कारण शोधणे सोडले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...