आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Insurance Company's Decision : Health , Vehicles Insurance Price Hiking

विमा कंपन्‍यांचा निर्णय : आरोग्य, वाहन विमा महागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एप्रिल महिन्यापासून समूह आरोग्य विमा आणि मोटार विम्यासाठी जास्त प्रीमियम द्यावा लागण्याची शक्यता आहे. ग्रुप हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये 20 टक्के, तर वाहन विम्याच्या ओन डॅमेज (ओडी) सेगमेंटच्या प्रीमियममध्ये 10 टक्के वाढ करण्याचा सर्वसाधारण विमा कंपन्यांचा विचार आहे. वैद्यकीय खर्च, मजुरी वाढल्याने तसेच स्पेअर्स पार्टस्च्या किमतीत वाढ झाल्याने येत्या एप्रिलमध्ये पॉलिसींच्या नूतनीकरणावेळी विमा कंपन्या ही वाढ अमलात आणण्याच्या तयारीत आहेत. समूह आरोग्य विमा प्रकारात बहुतेक कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

खासगी क्षेत्रातील विमा कंपनी भारती अक्सा जनरल इन्शुरन्सचे सीईओ डॉ. अमरनाथ अनंतनारायण यांनी सांगितले, ग्रुप हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये 20 टक्के, तर वाहन विम्याच्या ओन डॅमेज (ओडी) सेगमेंटच्या प्रीमियममध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ होईल. तोट्यात असलेल्या पॉलिसीत वाढ तरी होईल किंवा त्याचे कव्हरेज तरी कमी होईल. समूह आरोग्य विमा अंतर्गत येत असलेल्या विविध घटकांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशा स्थितीत कंपन्यांना फायदे कमी करा किंवा प्रीमियम वाढवा असे दोन पर्याय देण्यात येणार आहेत, तर वाहन विम्याच्या ओडी सेगमेंटच्या प्रीमियममध्ये 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. लेबर कॉस्ट वाढल्यामुळे तसेच सुट्या भागाच्या किमतीतील वाढ लक्षात घेता प्रीमियममध्ये 10 टक्के वाढ अपरिहार्य आहे.

एका सरकारी विमा कंपनीच्या अधिका-याच्या मते, वैद्यकीय महागाई दरात साधारण महागाईच्या तुलनेत दुप्प्ट वाढ होत आहे. त्यामुळे समूह आरोग्य विमा प्रीमियममध्ये 15 ते 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. मात्र, एकूण प्रीमियम आणि क्लेम खर्चावर ही वाढ अवलंबून राहील. समूह आरोग्य विम्याचा प्रीमियम दोन प्रकारे वाढतो. कंपनीत नवा कर्मचारी आल्यास आणि वैद्यकीय महागाई दराच्या आधारावर प्रीमियम ठरतो. सरकारी विम्या कंपन्यांत स्पर्धेवर मात करण्यासाठी प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे.

समूह विमा महागणार
खासगी क्षेत्रातील फ्यूचर जनराली कंपनीचे आरोग्य विमाप्रमुख शिराज देशपांडे यांनी सांगितले, बहुतेक कंपन्यांना समूह आरोग्य विमा क्षेत्रात तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे एप्रिलपासून आरोग्य विमा प्रीमियममध्ये जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. एकमेकांतील स्पर्धेमुळे कंपन्यांनी जानेवारीमध्ये प्रीमियममध्ये विशेष वाढ केली नव्हती. यामुळे सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपन्या समूह विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ करतील.

वाढीची शक्यता कमी
आयसीआयसीआय लोम्बार्डचे प्रमुख (अंडररायटिंग व क्लेम) संजय दत्ता यांच्या मते वाहन विम्याच्या थर्ड पार्टी प्रीमियममध्ये एप्रिलपासून वाढ होणार आहे. त्यामुळे वाहन विम्याच्या ओडी सेगमेंटमध्ये वाढीची शक्यता कमी आहे. असे असले तरी इतर कंपन्यांच्या अधिका-यांच्या मते ओडी सेगमेंटही महागणार आहे.