आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Insurance Sector : Get Cashless Claim Throught Prepaid Card

विमा क्षेत्र : प्रीपेड कार्डद्वारे कॅशलेस क्लेम काही सेकंदात मिळवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या साधारण विमा क्षेत्रात लार्सन अँड टुब्रोच्या मालकीच्या एल अँड टी जनरल इन्शुरन्स कंपनीने नवी क्रांती घडवली आहे. कंपनीने आरोग्य विमा क्षेत्रात प्रीपेड कार्ड आणले आहे. त्यासाठी एल अँड टी जनरल इन्शुरन्स आणि मेडिटेक ग्लोबल या कंपन्यांत करार झाला आहे. कंपनीने मंगळवारी हे कार्ड सादर केले. या कार्डमुळे कॅशलेस आरोग्य विमा क्लेम काही सेकंदांत ग्राहकांना मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. अशा प्रकारचे तंत्र आणणारी एल अँड टी इन्शुरन्स ही पहिली कंपनी ठरली आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना प्रत्यक्षात आणण्याची तयारी एल अँड टीने गेल्या आठवड्यातच पूर्ण केली होती. त्यासाठी कंपनीने वैद्यकीय उपकरणे बनवणा-या ग्लोबल मेडिटेक कंपनीशी करार केला आहे. या कार्डला मेडिकॅश कार्ड असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांचे तीन तासांचे काम काही सेकंदांत होणार आहे. या प्रीपेड कार्डमुळे आरोग्य विमा घेणा-या ग्राहकांची चांगली सोय होणार आहे. सध्या देशातील साधारण विमा क्षेत्रात कोणाकडेच नसणारी ही एक अनोखी योजना असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सध्या ही सुविधा कंपन्यांच्या समूह आरोग्य विमा ग्राहकांसाठी उपलब्ध असून आगामी काळात ती इतर ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.


देशात आरोग्यासाठी होणा-या वार्षिक खर्चाच्या 10 टक्के खर्चालाही विमा छत्र नाही. हे लक्षात घेऊन एका मोठ्या बाजारपेठेवर नजर ठेवून एल अँड टी इन्शुरन्सने ही योजना आखली आहे. यासाठी कंपनी काही नवी विमा उत्पादने बाजारात आणणार आहे. लार्सन अँड टुब्रो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे सध्या 40 हून अधिक उत्पादने आहेत. गेल्याच वर्षी कंपनीने माय हेल्थ मेडिशुअर नावाचे क्लासिक विमा उत्पादन सादर केले होते. कंपनीने आगामी दोन ते तीन वर्षांत 25 टक्के जास्त प्रीमियम मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


विनाविलंब क्लेम
मेडिकॅश कार्डमुळे आरोग्य विम्यातील कॅशलेस क्लेम विनाविलंब मिळणार आहे. कार्डमुळे ग्राहकांचे तीन तासांचे काम काही सेकंदांत होईल. आरोग्य विमा घेणा-या ग्राहकांसाठी सुविधा.


प्रतीक्षा संपली
मेडिकॅश कार्डमुळे ग्राहकांना ऑन द स्पॉट क्लेमची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे या रकमेसाठीचा प्रतीक्षा कालावधी आता संपला आहे.
जॉयदीप रॉय, मुख्य कार्यकारी संचालक , एल अँड टी इन्शुरन्स