आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंड कंपन्यांच्या समभागांवर उड्या, ७,६०० काेटींची गुंतवणूक सात वर्षांतील उच्चांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी समभाग बाजारपेठेत जवळपास ७,६०० काेटी रुपयांची गुंतवणूक केली असून गेल्या सात वर्षांतील हे सर्वात जास्त प्रमाण अाहे. सरकार राबवत असलेला सुधारणा कार्यक्रम अाणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेले सकारात्मक वातावरण यामुळे हा गुंतवणुकीचा वेग वाढला अाहे; परंतु त्या उलट मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात या फंडांनी २,६९८ काेटी रुपयांचा िनधी बाजारातून काढून घेतला होता.

भांडवल बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार म्युच्युअल फंडांनी यंदाच्या एप्रिल महिन्यात ७,६१८ काेटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक समभागांमध्ये केली अाहे. या अगाेदर जानेवारी २००८ मध्ये समभागांमध्ये ७,७०३ काेटी रुपयांचा निधी अाला हाेता. त्याशिवाय निधी व्यवस्थापकांनी गेल्या महिन्यात कर्ज बाजारपेठेतही २८,६५० काेटी रुपयांची िनव्वळ गुंतवणूक केली हाेती. गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा सकारात्मकता अाली असून सरकारच्या सुधारणा कार्यक्रमालादेखील वेग येऊ लागला अाहे. अर्थव्यवस्थेत हाेत असलेली सुधारणा अाणि किरकाेळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यामुळे माेठ्या प्रमाणावर निधीचा अाेघ येत असल्याचे तज्ज्ञांनी सांिगतले.

म्युच्युअल फंडांची शिखर संस्था असलेल्या असाेसिएशन अाॅफ म्युच्युअल फंड्स अाॅफ इंडियाने म्युच्युअल फंड वितरकांना देण्यात येणा-या कमिशनची मर्यादा एक टक्का करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या क्षेत्रावर परिणाम हाेण्याची भीती व्यक्त करण्यात येत अाहे.