आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Insurance Company May Soon Hike Mediclaim Premium Rates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य विमा महागणार, इर्डाकडे प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आरोग्य विम्याचा प्रीमियम 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातील साधारण विमा कंपनी आरोग्य विम्याचा प्रीमियम वाढवण्यासाठी एक्चुरियल व्हॅल्युएशन करते आहे. प्रीमियम वाढवण्याच्या मंजुरीसाठी आपले आरोग्य विमा उत्पादन कंपनी लवकरच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे (इर्डा) पाठवणार आहे.

ओरिएंटल इन्शुरन्सच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले, गेल्या सहा वर्षांत आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ करण्यात आलेली नाही. दरम्यान, उपचारांसाठीच्या खर्चात मात्र सातत्याने वाढ होत आहे. आरोग्य विम्याचा प्रीमियम वाढवण्यासाठी आम्ही एक्चुरियल व्हॅल्युएशन करत आहोत. त्यानंतर हे उत्पादन इर्डाकडे पाठवण्यात येईल. व्यक्तिगत स्वरूपाच्या आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम वाढवण्यासाठी इर्डाची मंजुरी आवश्यक असते. आरोग्य विमा क्षेत्रातील नुकसान लक्षात घेता समूह (ग्रुप) आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये 10 ते 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाच्या निर्देशानंतर एकमेकांचे ग्राहक ओढण्याचे आरोग्य विमा क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे समूह आरोग्य विम्याकडे कंपन्या अधिक लक्ष देत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील समूह आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर कंपन्यांची नजर आहे. आरोग्य विमा कारभारातील नुकसान कमी करण्यासाठी सरकारी विमा कंपन्यांनी एजंटांच्या कमिशन रचनेतही बदल केले आहेत. नव्या रचनेनुसार 25 ते 35 वयोगटातील व्यक्तीचा विमा उतरवल्यास एजंटांना 15 टक्के कमिशन देण्यात येत आहे.

एक्चुरियल व्हॅल्युएशन आहे तरी काय
विमा क्षेत्रात जोखमीच्या बाबी लक्षात घेऊन उपलब्ध आकड्यांच्या आधारे गणितीय आकडेमोडीच्या मदतीने प्रीमियमची रक्कम निश्चित करण्याच्या प्रक्रियेला एक्चुरियल व्हॅल्युएशन असे म्हणतात. जोखमीच्या आधारेच विमा पॉलिसीचा प्रीमियम निश्चित करण्यात येतो. त्यामुळे आरोग्य विमा महागण्याची शक्यता आहे.

नेमके काय होणार
आरोग्य विम्याचा प्रीमियम वाढवण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी एक्चुरियल व्हॅल्युएशन करत आहे
त्यानंतर हे आरोग्य विमा उत्पादन इर्डाकडे पाठवण्यात यईल
इर्डाकडून वाढीव प्रीमियमला मंजुरी मिळाल्यास प्रीमियममध्ये 20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.