आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन-धन योजनेतील विमा दाव्याच्या वेळ मर्यादेत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने (एनपीसीआय) पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत क्लासिक कार्डधारकांना दुर्घटना विमा दाव्यावरील अटी शिथिल केल्या आहेत.
याअंतर्गत विम्याचा दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या देण्याघेण्याची वेळ मर्यादा ४५ दिवसांवरून वाढवून ९० दिवस केली आहे. हा नियम बुधवारपासून लागू झाला आहे. एनपीसीआयचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. होता यांनी ही माहिती दिली. क्लासिक कार्ड असलेल्या व्यक्तीच्या अपघात (मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व) प्रकरणात विम्याचा दावा करण्यासाठी ९० दिवस आधी त्याच्या खात्यातून कमीत कमी एकदा व्यवहार होणे अनिवार्य आहे.

यासाठी एटीएम, ई-कॉमर्स, मायक्रो एटीएम आणि बँकेच्या प्रतिनिधीमार्फत खात्याचा वापर केलेला हवा. पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत कार्डधारकांना एक लाख रुपयांचा विमा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी आता ९० दिवसात एकदातरी व्यवहार होणे आवश्यक आहे.