आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीर्घ मुदती विम्यावर कर नको : इर्डा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विमा क्षेत्रात कंपनी किंवा उत्पादने सुधारणांच्या केंद्रस्थानी न ठेवता ग्राहकांचा विम्यावरील विश्वास वाढवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. देशातल्या जास्तीत जास्त ग्राहकांना विम्याचे सुरक्षा कवच मिळाले तरच विमा व्यवसायाची भरभराट होऊ शकेल, असा विश्वास विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरणाचे (इर्डा) मावळते अध्यक्ष जे. हरिनारायण यांनी सोमवारी मुंबईत बोलताना व्यक्त केला.

येणा-या अर्थसंकल्पासाठी प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत दिल्या जाणा-या वजावटीची सध्याची एक लाख रुपयांची मर्यादा वाढवणे, दीर्घ मुदतीच्या विमा पॉलिसीवर कोणत्याही कराची आकारणी न करणे अशा ग्राहकोपयोगी सूचना करण्यात आल्या असल्याचे नारायणन यांनी ‘जागतिक अ‍ॅक्च्युअरी’ परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

सामायिक अर्ज येणार
विमा एजंटाकडून सामान्य ग्राहकांना दिशाभूल करणारी माहिती दिली जाऊ नये व विमा ग्राहकांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी प्राधिकरणाकडून एका सामायिक अर्जाची निर्मिती करण्यात येत असल्याचे सांगून नारायण यांनी विमा क्षेत्रात मूलभूत संशोधन करणा-या अ‍ॅक्च्युअरी व्यावसायिकांनी या व्यवसायाच्या विकासासाठी मूलभूत सूचनांचा विचार करावा, असे आवाहन केले.
हरि नारायण हे 20 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असून, विमा क्षेत्रात अनेक ग्राहकोपायोगी सुधारणा गेल्या काही वर्षात त्यांनी राबवल्या आहेत.