आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रघुराम राजननी केले नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - व्याजदर कपातीच्या अपेक्षांना सुरुंग देत रिझर्व्ह बँकेचे तरुण गव्हर्नर रघुराम राजन यांनी रेपो दरात वाढ करून सर्वांना धक्का दिला. भावनेपेक्षा महागाई नियंत्रणाला महत्त्व देत राजन यांनी कर्ज महाग केले. आता व्यापारी बँका याचा भार ग्राहकांवर टाकणार हे निश्चित असल्याने ऐन सणासुदीच्या काळात कर्ज महागल्याने स्वप्नातील घर, कार खरेदी आता अनेकांना लांबणीवर टाकावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावर उद्योग, वाहन आणि औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे.


दखल घ्यावी
व्याजदरात कपात आणि कर्जाची मुबलक प्रमाणात उपलब्धता ही उद्योग क्षेत्राची प्रमुख मागणी होती. परंतु यापुढे तरी रिझर्व्ह बॅँक याची दखल घेईल. नैना लाल किडवाई, अध्यक्ष, फिक्की


वाढ अनावश्यक
भांडवलाच्या वाढत्या खर्चाचा ताण आणि रोकड सुलभतेची नाजूक स्थिती अशा परिस्थितीत रेपो दरातील वाढ टाळता येण्यासारखी होती. ते न करता रेपो वाढवला आहे. चंद्रजित बॅनर्जी, महासंचालक, सीआयआय


घडले उलटे
अपेक्षेपेक्षा उलटेच घडले. रिझर्व्ह बँकेने नाणेनिधी महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले आहे. रघुराम राजन यांच्याकडून बर्‍याच अपेक्षा होत्या. राणा कपूर, अध्यक्ष, असोचेम


महागाईवर लक्ष
रिझर्व्ह बँकेने आर्थिक वृद्धीच्या तुलनेत महागाई नियंत्रणावर मुख्य लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक यंत्रणेत पुरेशी रोकड सुलभता आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या धोरणात आणखी काही पावले उचलली जाणे अपेक्षित होते. महागाईच्या चिंतेमुळेच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली, परंतु जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि ऊर्जा किमती लक्षात घेता महागाईचा ताण आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. एमएसएफ आणि सीआरआर कमी करण्याचा मात्र रोकड सुलभतेवर सकारात्मक परिणाम होणार आहे. कपिल वाधवान, अध्यक्ष, डीएचएफएल