आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स लाइफच्या 25 नव्या विमा योजना होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ग्राहकांना गरजेवर आधारित विमा सेवा पुरवतानाच पारंपरिक विमा योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करताना खासगी विमा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीने पुढील वर्षात 25 नवीन विमा योजना आणण्याचा संकल्प सोडला आहे.
आयुर्विमा नियामक विकास प्राधिकरणाकडून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहातील रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचा एक भाग असलेल्या या कंपनीने ‘जुने ते सोने’ हा सूर आळवताना 25 नवीन विमा उत्पादने बाजारात आणण्याचा विचार केला आहे. एक जानेवारीपासून लागू होणार्‍या नवीन विमा नियमानुसार ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. आमच्या प्रस्तावित बहुतांश विमा उत्पादनांना प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली असून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत ती बाजारात आणण्यात येतील. प्रामुख्याने पारंपरिक योजनांवरच लक्ष केंद्रित करून ग्राहकांना साधी आणि गरजेवर आधारित विमा उत्पादने देण्यात येणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप राऊ यांनी सांगितले. या प्रस्तावित नवीन उत्पादनांमध्ये पारंपरिक विमा योजनांचा 80 टक्के तर युनिटशी निगडित विमा योजनांचा वाटा 20 टक्के असेल, असेही ते म्हणाले. नव्या तत्त्वांनुसार पारंपरिक विमा, बदलता विमा आणि युनिट लिंक प्रकारांमध्ये योजनांचे विभाजन करण्यात आले आहे.