आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचा विमा तसेच जगात कुठेही उपचार घेण्याची सुविधा अशी वैशिष्ट्ये असलेल्या रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरात आजपासून (मंगळवार) व्यवसायास औपचारिक प्रारंभ केला.
निव्वळ आरोग्य विमा क्षेत्रावर भर देणाऱ्या रेलिगेअर कंपनीने सहा महिन्याच्या अवधीत एक लाख दहा हजार ग्राहकांचा विमा उतरविला असून त्याद्वारे २६ कोटी रुपये प्रिमिअम गोळा केल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य अधिकारी नितीन जैन यांनी दिली. ते म्हणाले की, प्रतिबंधावर आधारित विमा हे कंपनीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भविष्यातील आरोग्य खर्च कमी होतो. दोन लाख ते कमाल ६० लाख रुपये विमा रकमेची हमी, वर्षातून एकदा निशुल्क तपासणी कमाल तीन वर्षाचा विमा घेतल्यास १० टक्के प्रिमिअममध्ये सवलत ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस या योजनेत सहभागी होण्याचे स्वातंत्र्य आहे. एखाद्या ६० वर्षाच्या व्यक्तीने विमा उतरविला तर चार वर्षाचे बंधन संपल्यावर सर्व लाभ मिळू शकतील. आज अनेक रुग्णांना विशेष उपचारासाठी परदेशात जावे लागते त्याची जोखीम कंपनी घेते. एखाद्या विमाधारकाला भरपाई द्यावी लागली तरी हप्ता रकमेत वाढ केली जात नाही. देशातील १२४ शहरात कंपनीचे प्रतिनिधी असून ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढविली जाणार आहे.
आरोग्य विमा क्षेत्राची देशाची बाजारपेठ १५ हजार कोटी रुपयांची असून सध्या आरोग्य विमा घेतलेल्या ग्राहकांचे प्रमाण केवळ पाच टक्के आहे. येत्या तीन वर्षात ही बाजारपेठ दुप्पट म्हणजे ३० हजार कोटी रुपयांची होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.