आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणुकरारामुळे पालटला बाजाराचा नूर; खरेदीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अणुकरारामुळे पश्चिम अाशियाई देशांमधून भारताला हाेणाऱ्या तेल िनर्यातीमध्ये वाढ हाेण्याची शक्यता अाहे. या करारामुळे बाजाराचा नूर बदलला अाणि खरेदीचा जाेर वाढला. त्यामुळे सेन्सेक्सने २६५ अंकांची उसळी मारत पुन्हा २८ हजार अंकांचे िशखर गाठले. िनफ्टीदेखील ८५२३.८० अंकांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.
विदेशी गुंतवणूकदारांनीदेखील सक्रिय हाेऊन खरेदीचा सपाटा कायम ठेवला अाहे. या गुंतवणूकदारांनी मंगळवारी २७० काेटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. त्यामुळेदेखील बाजाराचा उत्साह अाणखी वाढला.

खरेदीचेपाठबळ मिळाले
अांतरराष्ट्रीयपातळीवरील सकारात्मक घडामाेडींमुळे सेन्सेक्स २८,०२२.१४ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. िदवसअखेर खरेदीच्या पाठबळामुळे वाहन, माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान समभागांना मागणी येऊन सेन्सेक्स २६५.३९ अंकांची झेप घेऊन २८,१९८.२९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. िनफ्टीदेखील ८५०० अंकांची पातळी अाेलांडून ८५३१.४० अंकांच्या कमाल पातळीवर गेला. िदवसअखेर िनफ्टीमध्ये ६९.७२ अंकांची वाढ हाेऊन ताे ८५२३.८० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

तसेच आता ग्रीसच्या संसदेत बेल अाऊटला मान्यता िमळण्याच्या शक्यता देखील वाढली आहे. या मुळे युराेप शेअर बाजाराने सुरुवातीचा ताेटा भरून काढला. िब्रटन, जर्मनी, फ्रान्स शेअर बाजारातही तेजी हाेती. चीनच्या जीडीपीमध्ये अाश्चर्यकारक सुधारणा झाल्यामुळे तेथील शेअर बाजारांमध्ये संिमश्र वातावरण हाेते.

टाॅप गेनर्स
मारुतीसुझुकी, टाटा माेटर्स, विप्राे, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, लुपिन, एचडीएफसी, िरलायन्स, इन्फाेसिस, सन फार्मा, बजाज अाॅटाे.

कच्च्या तेलावर परिणाम
अमेरिका,िब्रटन, फ्रान्स, रशिया अाणि जर्मनी या सहा प्रमुख अण्वस्त्रधारी देशांनी इराणबराेबर केलेल्या अणुसमझाेता करारामुळे तेहरानच्या तेल िनर्यातीला गती िमळण्याची आशा वाढली असल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या िकमती गडगडल्या आहेत. इराणवरील िनर्बंध उठताच अांतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी हाेतील अाणि या कराराचा भारताला, पर्यायाने उद्योगांना चांगला लाभ हाेईल, अशी अपेक्षा वाढल्यामुळे बाजारात खरेदीचा जाेर वाढल्याचे मत हेम िसक्युरिटीजचे संचालक गाैरव जैन यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...