आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traditinal Insurance Gets New Regulation From 8 Februrary :irda

पारंपरिक विमा योजनांसाठी नवी नियमावली 8 फेब्रुवारी ला होणार जाहीर : इर्डा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हैदराबाद - पारंपरिक विमा योजनांसाठी नवी व अंतिम नियमावली 8 फेब्रुवारी रोजी होणा-या बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल, असे विमा नियामक व नियंत्रक इर्डाने सोमवारी स्पष्ट केले.

इर्डाचे चेअरमन जे. हरिनारायण यांनी सांगितले, विमा सल्लागार समितीने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती इर्डाच्या मागील बैठकीत तपासण्यात आली. यात फारसा बदल न करता ती स्वीकारण्यात येतील. आयुर्विम्यासंदर्भात असलेल्या या नियमावलीमुळे मोठे बदल होणार आहेत. सध्या असलेल्या टर्म विमा आणि एंडोव्हमेंट विमा योजना विमाधारकांनी 31 मार्चपर्यंत काढून घ्याव्यात व फेरभरण कराव्यात, असे इर्डाने सुचवले आहे. विमा कंपन्यांनी यावर आक्षेप घेत व्यावहारिकदृष्ट्या हे अशक्य असल्याचे म्हटले आहे.नव्या नियमावलीत भरण्यात येणा-या प्रीमियमच्या दहापट सम अ‍ॅश्युअर्डची रक्कम असावी, असे प्रस्तावित आहे.