आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वेडिंग इन्शुरन्स’ एक सुकर मार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह सोहळा हा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असून तो खूप खर्चीकसुद्धा आहे. हा एक अविस्मरणीय सोहळा असून आयुष्यभर आनंद देणारा असतो. असे असूनदेखील काही अनिश्चित कारणांमुळे, जसे की अपघात, माणसांमुळे घडलेल्या दुर्घटना (मॅन मेड डिझास्टर्स), नैसर्गिक आपत्ती किंवा अडथळे या गोष्टी विघ्ने आणू शकतात. या सगळ्या अनिश्चित कारणांपासून सुटका मिळवण्यासाठी ‘वेडिंग इन्शुरन्स’ (विवाह विमा) हा उत्तम पर्याय असू शकतो .
विवाह योजनाकारांच्या (वेडिंग प्लॅनर) मते आजघडीला भारतात सवर्साधारणपणे एका मध्यमवर्र्गीय कुटुंबामधील लग्नाचा खर्च हा 5 लाखांपर्यंत जातो. एवढा प्रचंड खर्च होत असेल तर मग तुम्ही वेडिंग इन्शुरन्स का घेत नाहीत ?

1. कोणत्या जोखमेपासून सुरक्षा मिळते :
अ. आग किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे लग्न रद्द झाले/ पुढे ढकलावे लागले.
ब. वधू किंवा वराला अपघात झाला.
क. विवाहाच्या तारखेपूर्वी रक्ताच्या नातेवाइकाचा अपघाती मृत्यू झाला.
ड. आग, चोरी, दरोडा यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले.
ई. लग्नघरातील रोकड.
फ. लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा.

2. कोणत्या जोखमेपासून सुरक्षा मिळत नाही :
अ. दहशतवादी घटना.
ब. वर, वधू अथवा घरच्यांमधील वादामुळे लग्न तुटले तर.
क. संप किंवा परिवहन यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे.
ड. जाणीवपूर्वक केलेले नुकसान.

3. जोखमेपासून सुरक्षा मिळण्याचा कालावधी :
सर्वसाधारणपणे विवाह सोहळा हा जास्तीत जास्त ७ दिवस चालतो. त्या अनुषंगाने विमा कंपन्या 1 दिवस ते ७ दिवसांचा विमा देतात. साधारणत: प्रथागत कार्यक्रम (पत्रिकेवर छापलेले) जसे की देवब्राह्मण, संगीत, मेंदी यांच्या 24 तास अगोदरपासून विमा संरक्षण प्राप्त होते.

4. जोखमेपासून सुरक्षा मिळण्याची किंमत :
सवर्साधारणपणे लोकांचा असा गैरसमज असतो की, वेडिंग इन्शुरन्सचा प्रीमियम हा खूप जास्त खर्चीक असतो. पण ही बाब चुकीची आहे. प्रीमियम खर्च हा विमा कव्हरच्या 0.७ % ते 2.0 % असतो.

बजाज अलायन्झतर्फे चार प्रकारच्या विवाह विमा योजना उपलब्ध करण्यात आल्या असून त्यांची विमा संरक्षण रक्कम (सम अश्युअर्ड) दोन लाख, चार लाख, सहा लाख आणि आठ लाख रु. आहे आणि त्यांचे प्रीमियम 3,७७0 पासून 14,2७६ पर्यंत आहेत.

5. दावा ( क्लेम) करताना :
अ. सर्व पुरावे जसे की बिल, अ‍ॅडव्हान्स रक्कम पावत्या
ब. घटना घडल्याच्या 30 दिवसांत विमा कंपनीला कळवावे.
क. घरफोडी झाली असल्यास एफआयआरची (ऋकफ) प्रत
ड. दागिने चोरी गेल्यास त्यांची बिल व एफआयआर
ई. अपघात झाल्यास हॉस्पिटलचे बिल / पुरावा.
शेवटच्या क्षणी वेडिंग इन्शुरन्स कमीत कमी लग्नाच्या 15 दिवस तरी अगोदर काढा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी कव्हर तसेच पॉलिसी समजून घेता येईल. विमा घेतल्यावर आठवणीने सर्व खर्चाची बिले, पावत्या, दागिन्यांचे मूल्यांकन यांचे पुरावे ठेवावेत.