आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला बँकेच्या महिला खातेदारांसाठी खास विमा योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वतंत्र बँक सुरू झाल्यामुळे महिलांना फार मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. पण भारतीय महिला बँक आता आर्थिकबरोबरच आरोग्याची काळजीही घेणार आहे. महिला खातेदारांना आरोग्यसेवा देण्यासाठी या बॅँकेने न्यू इंडिया अँशुरन्स कंपनीबरोबर करार केला आहे.बीएमबी सखी, बीएमबी निर्भया आणि बीएमबी परिवार सुरक्षा अशा या तीन आरोग्य विमा योजना न्यू इंडिया अँशुरन्सच्या मदतीने देण्यात येणार असल्याचे बँकेच्या अध्यक्ष उषा अनंतसुब्रमण्यम यांनी सांगितले.
स्व. इंदिरा गांधी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला या महिला बँकेचे उद्घाटन करण्यात आले. एक हजार कोटी रुपयांच्या भांडवलासह सुरू झालेली ही वैश्विक बँक आहे.
अशा आहेत योजना
बीएमबी सखी : खास ग्रामीण महिलांसाठी, 50 हजार रुपयांपर्यंत विमा कवच.
बीएमबी निर्भया : पाच लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा
बीएमबी परिवार : कौटुंबिक फ्लोटर सुविधा