आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकिंग प्रणालीत 2.5 लाख कोटी परत येणार नाहीत : एसबीआय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोटाबंदीनंतर सुमारे २.५ लाख कोटी रुपये बँकिंग प्रणालीत परत येणार नसल्याचा अंदाज देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. यामुळे सुमारे १४ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर झाल्या आहेत.
एसबीआयच्या अर्थव्यवस्था संशोधन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मार्च २०१६ मधील आकडेवारीच्या आधारावर १४.१८ लाख कोटी रुपयांची मुद्रा चलनातून बाहेर गेली असण्याची शक्यता एसबीआयच्या विश्लेषणात व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये सध्या बँकांमध्ये असलेल्या रकमेचा समावेश करण्यात आलेला नाही. जर नोटाबंदीच्या एक दिवसानंतर म्हणजेच ९ नोव्हेंबरची आकडेवारी पाहिली तर एकूण १५.२६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या नोटा चलनातून बाहेर झाल्या आहेत. मार्चमधील आकडेवारीत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा हा आकडा १.२६ लाख कोटी रुपयांनी जास्त आहे. १० ते २७ नोव्हेंबरदरम्यान बँकांमध्ये ८.४४ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...