आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Top Ways For Womens To Make Money From Home Quickly

6 TIPS: महिलांनो घसबसल्या कमवा पैसे, पहिल्या महिन्यापासूनच उत्पन्नाला होईल सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः दिल्लीतील मयूर विहारमध्ये राहाणारी राधिका कपूर हिचे लग्न मागीलवर्षी डिसेंबरमध्ये झाले. दोन महिन्यानंतर ती घरात बसून कटाळू लागली. तेव्हा अचानक तिच्या एका मैत्रिणीने तिला सांगितले की, तु घरबसल्या तुझा कुकींग बिझनेस सुरू करू शकतेस. यामध्ये चांगला पैसाही मिळतो. मग काय राधिकाने स्वयंपाकालाच लाच स्वतःचे करिअर बनवले. आज राधीका महिन्याला 90 हजार रुपये कमावते. साधारणतः महिला घर आणि कुटुंबामुळे करिअरसोबतच या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतात, मात्र निराश होण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही अशा टीप्स ज्यांच्या साह्याने गृहिणी महिला घरबसल्या पैसे कमाऊ शकतात. या पध्दतींचा अवलंब केल्यास दरमहा तुम्हीही चांगली रक्कम कमाऊ शकता.

कसे कमावले राधिकाने 90 हजार
राधिकाने स्वयंपाकाच्या माध्यमातून मयूर विहारजवळील एका गर्ल हॉस्टेलमध्ये डबे देण्याचे काम सुरू केले. राधिकाने सुरूवातीला 12 टिफिनसोबत सुरूवात केली होती. आज तिच्याजवळ 60 टिफिनची डिलेव्हरी आहे. एक टिफिनसाठी ती 50 रुपये घेते. यामुळे त्यांची दिवसाची कमाई झाली 3000 रुपये म्हणजेच महिना 90 हजार रुपये. राधिकाने व्यवसायाच्या पहिल्या महिन्यापासूनच पैसे कमावण्यास सुरूवात केली. मात्र सुरुवातीला ही रक्कम केवळ 18 रुपये होती. मात्र जसजसे टिफिनची संख्या वाढत गेली, तसतसे राधिकाचे उत्पन्नही वाढत गेले. जर तुम्हीही घरबसल्या टिफीन सिस्टीम सुरू करु शकता. ज्यामुळे तुम्हाला चांगली रक्कम कमावता येईल.

पुढील स्लाईडवर वाचा, इतरही काही घरबसल्या कमावण्याच्या पध्दतींबद्दल...

नोटः फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.