आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिशीतील तुमच्या या 5 चुका, भविष्यात करतील कोट्यवधींचे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तिशी हे वय तसे मौज-मस्तीने जगण्याचे मानले जाते, किंबहुना लोक तसेच जगत असतात. मात्र या वयात तुम्ही पुढील आयुष्यासाठी आर्थिक नियोजन केले नाही तर फार मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. 50-60 वर्षेंचे तुम्ही झाल्यानंतर तोच पैसा कामाला येतो जो तुम्ही तिशीत गुंतवला होता. जर तुम्ही असे केले नाहीतर कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज आम्ही अशाच 5 चुका सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे कोट्यवधींचे नुकसान टळू शकते.

 

#1- भविष्यातील महागाईकडे डोळेझाक करु नका... 
- सर्वसामान्यपणे लोक फक्त आजचा विचार करतात. भविष्यातील महागाईची चिंता कोणी करत नाही. याच चुकीचा भविष्यात फटका बसू शकतो.
- 1997 मध्ये 1 लाख रुपये जर तुमच्याकडे असतील तर महागाईच्या हिशेबाने आज ते फक्त 29 हजार रुपये आहेत. 
- अशावेळेस टर्म इंशूरन्स असेल किंवा इतर कुठला मोठा खर्च येणार असेल तर त्याचे नियोजन हे भविष्यातील महागाईचा विचार करुन केले पाहिजे. पेंशन प्लॅन घेतानाही हा विचार नक्की केला पाहिजे. 

 

#2- इन्शूरन्स 
- हेल्थ इन्शूरन्स तसे सर्वच घेतात. काहींना कंपनीकडून तो मिळतो. मात्र लाइफ इन्शोरन्स बद्दल लोक जास्त विचार करत नाही. 
- भविष्यात काहीही होऊ शकते. अशावेळस जर सेव्हिंग आणि इतर आर्थिक सपोर्ट नसेल तर तुमच्या कुटुंबाला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी हेल्थ इन्शूरन्स आणि लाइफ इन्शूरन्स दोन्हीही महत्त्वाचे आहेत. 

 

#3 - कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या फेऱ्यात अडकू नका 
- सामान्यपणे असे आढळून आले आहे की लहान-मोठी कोणतीही गरज असेल तर लोक कर्ज घेण्याचा लागलीच विचार करतात. हे तुमच्यासाठी फार घातक आहे. 
- कर्ज घेताना नेहमी हा विचार केला पाहिजे की ते आपण फेडू शकतो का?  मग ते होम लोन असेल नाही तर पर्सनल लोन. किंवा क्रेडिट कार्डचे बील. 
- सेव्हिंग पेक्षा उत्पन्नातील 60-70% रक्कम कर्ज आणि क्रेडिट बील भरण्यावर खर्च होत असेल तर उत्पन्नाला काही अर्थ उरत नाही. 
- अशा स्थितीत लोन आणि क्रेडिटपासून दूर राहिलेलेच चांगले. 

 

#4 - फक्त बचत नाही, गुंतवणूकही महत्त्वाची 
- नेहमी असे पाहायला मिळते की लोक बचत करतात परंतू गुंतवणूक करत नाही. तुमच्या डोक्यातही असाच काही विचार असेल तर प्रथम तो डोक्यातून काढून टाका. 
- पैसा फक्त सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवणे ही एक प्रकारची तुमची चूक ठरु शकते. जर गुंतवणूक केली तर तुमचा पैसा वाढू शकतो. 
- म्युचुअल फंड्स, स्टॉक मार्केट, टर्म इन्शूरन्स या सारख्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, आणखी एका चुकीबद्दल... 

बातम्या आणखी आहेत...