आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा होणार एक कोटी जणांना फायदा; जाणून घ्या याविषयी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 5 टक्के डीए मिळतो. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 5 टक्के डीए मिळतो. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्ता (डीए) 5% हून वाढवून 7 % केला आहे. 

 

 

आता किती डीए मिळत होता?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी कॅबिनेटची बैठक झाली. यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सला 2% अधिक डीए देण्यासाठी अतिरिक्त इन्स्टॉलमेंट देण्यास मंजूरी देण्यात आली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 5 टक्के डीए मिळतो.

 

 

सरकारवर किती भार पडणार?
- या निर्णयाचा भार सरकारच्या तिजोरीवरही पडणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने 6077.72 कोटी रुपये आणि 7090.68 इतका बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. हा बोजा जानेवारी 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीसाठी असणार आहे.

 

 

7 व्या वेतन आयोगाच्या सिफारशींवरुन आधारबाबत निर्णय
- महागाई भत्त्यातील ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या सिफारशीच्या आधारावर करण्यात आली आहे.

 

 

यापूर्वी सप्टेंबरमध्ये वाढला होता महागाई भत्ता
- यापूर्वी सप्टेंबर 2017 मध्ये महागाई भत्त्यात एक टक्के वाढ करण्यात आली होती. त्यामुळे तो 4 ते 5 टक्के झाला होता.
- सरकारने मार्च 2017 मध्ये महागाई भत्ता वाढविण्यात आला होता. त्यावेळी भत्ता 2 टक्क्याहून 4 टक्के करण्यात आला होता. ही वाढ 1 जानेवारी 2017 पासून लागू करण्यात आली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती  

 

 

बातम्या आणखी आहेत...