आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBI ने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट 6 टक्के कायम ठेवला, बँक कर्ज घेणे अजूनही स्वस्त नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (बुधवारी) आपले तिमाही पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. रेपो रेट 6 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 5.75  टक्के हाच कायम ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ ग्राहकांचे बँक लोन स्वस्त होणार नाही. त्यासोबतच इएमआयमध्ये कोणताही दिलासा मिळणार नाही. मॉनिटरी पॉलिसी कमिटीने (एमपीसी) हा निर्णय महागाई दर 4 टक्क्यांच्या रेंजमध्ये ठेवण्याच्या दृष्टीने घेतला आहे. 

 

रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेट मध्येही कोणताही बदल नाही. 
- याशिवाय एमपीसीने रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेट मध्येही कोणताही बदल केलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के आणि बँक रेट 6.25 टक्के आहे. 

 

पहिल्या तिमाहित महागाई 5.6% राहाण्याचा अंदाज 
- रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी मॉनिटरी पॉलिसी स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे, की आर्थिक उलाढाल वाढली आहे. त्यामुळे वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकला जाईल. त्यामुळे किंमती वाढू शकतात. याशिवाय महागाई किती वाढेल हे बहुतांश मान्सूनवर अवलंबून राहिल. शक्यता आहे की आगामी मान्सून सामान्य राहिल. 

बातम्या आणखी आहेत...