Home | Business | Personal Finance | anil ambani birthday special now mukesh ambani get way to will help anil

Anil Ambani Birthday: मुकेश अंबानी करणार लहान भावाची मदत, अशी वाचणार Rcom

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 04, 2018, 12:03 AM IST

बिझनेसमध्ये विभक्त झालेले अंबानी बंधु गेल्या वर्षी तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते. मुकेश अंबानी यांची 'र

 • anil ambani birthday special now mukesh ambani get way to will help anil

  मुंबई- मुकेश अंबानी यांच्या 'रिलायन्स जिओ इन्फोकॉमने' आणि अनिल अंबानी यांची कंपनी 'आरकॉम'सोबत डिसेंबरमध्ये स्पेक्ट्रम, मोबाइल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्क सहित अन्य मोबाइल बिझनेस एसेट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर NCLAT ने लावलेले निर्बंध मागे घेतल्याने आता मुकेश अंबानी हे अनिल अंबानी यांना मदत करु शकणार आहेत.

  आरकॉमवर 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज


  आरकॉमवर जवळपास 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून ते परत करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ही कंपनी स्पर्धेत टिकू न शकल्याने तिला 2017 च्या अखेरीस आपला व्यवसाय विकावा लागला होता. आरकॉमला जिओला आपले अॅसेट्स विकल्यावर 25,000 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे.

  इन्‍सॉल्‍वेंसी प्रोसिडिंग्‍ससाठी एरिक्‍सन इंडियाने केली होती अपील

  आरकॉम आणि त्यांच्या सब्सिडियरीज विरोधात इन्‍सॉल्‍वेंसी प्रोसिडिंग्‍ससाठी टेलिकॉम इक्यूपमेंट बनविणारी स्वीडिश कंपनी एरिक्सनने अपील केले होते. एरिक्‍सन आरकॉमची ऑपरेशनल क्रेडिटर आहे. यावर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्‍यूनल (NCLT) ने 15 मे रोजी मंजूरी दिली. आरकॉमकडे एरिक्सनची 978 कोटी थकबाकी होती. ती आता वाढून 1,600 कोटी रुपये झाली आहे. एरिक्‍सनने आरकॉमसोबत त्यांचे देशव्‍यापी टेलिकॉम नेटवर्क ऑपरेट आणि मॅनेज करण्यासाठी 2014 मध्ये 7 वर्षाची डील केली होती.

  पुढे वाचा: एरिक्सनला आरकॉम देणार 500 कोटी रुपये...

 • anil ambani birthday special now mukesh ambani get way to will help anil

  एरिक्‍सनला 500 कोटी रुपये आगाऊ देण्याची तयारी

   

  आरकॉमने एरिक्सन सोबतचा वाद मिटविण्यासाठी एरिक्‍सनला 500 कोटी रुपये आगाऊ देण्याची तयारी दर्शवली आहे. NCLAT ने आरकॉम आणि त्यांच्या सब्सिडियरीजला 120 दिवसांच्या आत एरिक्‍झन इंडियाला 550 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. हा अवधी 1 जून 2018 पासून सुरू होणार आहे. कंपनीद्वारे असे न करु शकल्यास ट्रिब्‍यूनल आरकॉमविरोधात इन्‍सॉल्‍वेंसी प्रक्रिया पुढे नेण्याचे निर्देश देईल.

Trending