आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या मुलाला द्या 40 लाखाचे गिफ्ट, महिना सुरू करा 12 हजाराची इन्वेस्टमेंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही आजपासूनच गुंतवणूकीस सुरूवात केली तर तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला वयाच्या 18 ते 21 व्या वर्षी 40 लाख रुपये त्यांना गिफ्ट देऊ शकता. यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या पब्लिक प्रॉविडंट फंडाची म्हणजेच PPF ची मदत होऊ शकते. PPF मध्ये गुंतवणूक करण्यास कोणतीही जोखिम नाही. येथील गुंतवणूक आणि त्याद्वारे मिळणाऱ्या परताव्याची गॅरंटी भारत सरकार देते. 40 लाखाचा परतावा मिळण्यासाठी तुम्हाला 15 वर्ष गुंतवणूक करावी लागेल.

 

 

कसे देऊ शकता 40 लाखाचे गिफ्ट
जर तुमचा मुलगा 3 वर्षाचा असेल तर तुम्ही त्याच्या नावाने PPF अकाउंट उघडू शकता. नियमानुसार तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने एकच PPF अकाउंट उघडू शकता. 15 वर्षात PPF अकाउंटमध्ये 40 लाख रुपये जमा होण्यासाठी तुम्हाला दरमहा 12000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. सध्या  PPF अकाउंटवर दरमहा 7.6 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. सध्याच्या व्याजदरानुसार 15 वर्षानंतर पीपीएफ अकाउंटमध्ये जवळपास 40 लाख रुपये जमा होतील. 

 


PPF अकाउंट उघडण्याचे फायदे

 

आकर्षक व्याज दर
सध्यस्थितीत पीपीएफवर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. हा व्याजदर सरकार निर्धारित करते. तुमची गुंतवणूक ही सुरक्षित असते.

 

करात सवलत
तुम्ही पीपीएफ अकाउंटमध्ये केलेली वार्षिक 1.5 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक ही करमुक्त असते. ही कर सवलत तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत मिळते. 

 

पीपीएफ अकाउंटवर कर्ज
तुम्ही पीपीएफ अकाउंटवर जमा रकमेवर कर्जही मिळवू शकता. हे कर्ज तुम्ही खाते उघडल्यानंतर तिसऱ्या वर्षापासून सहाव्या आर्थिक वर्षापर्यंत घेऊ शकता.  अचानक पैशाची गरज पडल्यास तुम्ही अशा रितीने सहज पैसे मिळवू शकता.

 

विदड्रॉअल फॅसिलिटी 
पीपीएफ अकाउंटमधून तुम्ही गरज पडल्यास एकुण रकमेच्या काही हिस्सा काढू शकता. काही रक्कम काढण्याच्या या सुविधेचा फायदा तुम्ही 7 व्या आर्थिक वर्षात घेऊ शकता.  

 

 

बातम्या आणखी आहेत...