आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- जर तुमच्या कुटूंबात सदस्यांची संख्या वाढली आहे आणि तुम्हाला घराचा आकार वाढवायचा आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे तुम्हाला हे शक्य होत नसेल तर सरकार तुम्हाला यासाठी मदत करत आहे. यातून तुम्ही तुमच्या घराचा विस्तार करु शकता.
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत यासाठी तुम्हाला 1.50 लाख रुपये देण्यात येतात. पण ही बाब फारच थोड्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्याचे लाभार्थीही कमीच आहेत.
तुमचे उत्पन्न किती असावे
सरकार 1.50 लाख रुपयाची सबसिडी त्या लोकांना देत आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे. या उत्पन्न गटाला इकोनॉमिकल विकर सेक्शन (EWS) म्हटले जाते. म्हणजेच तुम्ही जर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांमधील असाल तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.
किती असावा आकार
या योजनेचा फायदा तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुमच्याकडे 322 वर्ग फुट (30 वर्ग मीटर) चा प्लॉट असेल. म्हणजेच तुम्हाला तुमचे घर 322 वर्ग फुटापर्यंत वाढवायचे असेल तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता.
कच्ची घरे होणार पक्की
या योजनेचा फायदा त्यांनाही होऊ शकतो ज्यांचे घर कच्चे आहे. तुमचे घर पक्के करण्यासाठी सरकार तुम्हाला 1.50 लाख रुपये देईल.
तुमचे घराचे स्वप्न साकारा
जर तुमच्याकडे 30 वर्ग मीटर आकाराचा प्लॉट असेल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये असेल तर तुम्ही सरकारकडून 1.50 लाख रुपये घेऊन घर बांधू शकता.
हप्त्याने मिळतील पैसे
तुम्हाला 3 ते 4 हप्त्यांमध्ये हे पैसे मिळतील. तुमचे घर बनत असताना सरकार तुमच्या खात्यात 30-30 हजार रुपये जमा करेल.
पुढे वाचा: ही आहे मुख्य अट
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.