आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 200 वर्ग मीटरचा फ्लॅट खरेदी केल्यावरही मिळणार सब्सिडी, मध्यमवर्गाला फायदा Govt Increases Carpet Area Of Mig Flats

200 वर्ग मीटरचा फ्लॅट खरेदी केल्यावरही मिळणार सब्सिडी, मध्यमवर्गाला फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आता तुम्हाला 200 वर्ग मीटर (2152 वर्ग फुट) कारपेट एरियाचा  फ्लॅट खरेदी केल्यावरही होम लोनवर 2.30 लाख रुपयांची व्याज सब्सिडी मिळणार आहे. तर 160 वर्ग मीटर (1722 वर्ग फुट) कारपेट एरियाचा फ्लॅट खरेदी केल्यावर होम लोनच्या व्याजावर 2.35 लाख रुपये सब्सिडी मिळणार आहे. सरकारने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत क्रेडिट लिंक्ड सब्सिडी स्कीम अंतर्गत मध्यम उत्पन्न गटाच्या कॅटिगिरीत बदल केला असून कार्पेट एरियात 33 टक्के वाढ केली आहे. 

 


आतापर्यंत मिळत होती कोणाला सब्सिडी
मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत मध्यम उत्पन्न गटाचे दोन प्रवर्ग निर्माण केले आहेत. वार्षिक 6 ते 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना एमआयजी-वन आणि 12 ते 18 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना एमआयजी-2 कॅटिगिरीत सामील करण्यात आले आहे. आतापर्यंत एमआयजी-1 कॅटिगिरीत सामील असणाऱ्यांना 120 वर्ग मीटर कार्पेट एरियाचे घर खरेदी करण्यासाठी सब्सिडी मिळत होती. तर एमआयजी-2 कॅटिगिरीतीस लोकांना 160 वर्ग मीटर कार्पेट एरियाचे घर खरेदी करण्यासाठी सब्सिडी मिळत होती. याला वाढवून 150 वर्ग मीटर आणि 200 वर्ग मीटर करण्यात आली आहे.

 

 

काय होईल फायदा
प्रॉपर्टी कन्सल्टंट फर्म अनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, हे अतिशय महत्वाचे पाऊल आहे. याचा रियल इस्टेट बाजारावर सकारात्मक प्रभाव पडेल. टियर-टू आणि टियर-थ्री शहरांमध्ये घरांची विक्री वेगाने वाढेल. कारण या शहरांमध्ये जमिनीच्या किंमती कमी झाल्याने मोठे अपार्टमेंट घेण्याकडे लोकांचा कल वळू शकतो.


 

बातम्या आणखी आहेत...