Home | Business | Personal Finance | how to get your resume selected

फक्त 30 सेकंदात सिलेक्ट, Resume, CV बनविताना वापरा या ट्रिक्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 07, 2018, 01:01 PM IST

मुलाखतीस गेल्यावर तुमचा पहिला प्रभाव पडतो तो तुमच्या Resume चा. नोकरी डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, तुमच्या Res

 • how to get your resume selected

  नवी दिल्ली- मुलाखतीस गेल्यावर तुमचा पहिला प्रभाव पडतो तो तुमच्या Resume चा. नोकरी डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, तुमच्या Resume मुळे तुम्ही अवघ्या 30 सेकंदात समोरच्यावर प्रभाव पाडता. त्यामुळे तुमचा Resume किती प्रभावी असतो हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. तुमच्या रिझ्यूमचे स्ट्रक्चर, कंटेट आणि भाषा या तिन्ही बाबी महत्वाच्या असतात.

  रि‍क्रूटरकडे म्हणजेच नोकरी देणाऱ्या किंवा भरती करणाऱ्याकडे इतका वेळ नसतो की तो तुमच्या सीवीतील सगळ्या बाबी हेरु शकतो. त्यामुळे तुमचा सीवी असावा की एका नजरेत तुमच्यातील खास बाबी त्यांच्या लक्षात याव्यात. ज्या बाबी त्या नोकरी किंवा प्रोफेशनसाठी महत्वाच्या आहेत. फोर्ब्‍सच्या म्हणण्यानुसार, यासाठी तुमचा सीवी तुम्ही नव्या पध्दतीने बनवला पाहिजे.

  1 पहिली लाईन
  रिझ्युमसोबत तुमचे नाव, पत्ता, ई-मेल आयडीसोबत कोणती लिंक द्या जी तुमच्या ब्लॉग किंवा लिंक्ड इन प्रोफाईलपर्यंत नेईल. कंपन्या तुमच्या सोशल मुव्हमेंटही चेक करत असतात. जर तुमच्या फेसबुक प्रोफाईलवरुन तुमचे व्यक्तीमत्व झळकत असेल तुम्ही तो पत्ताही देऊ शकता.

  पुढे वाचा...

 • how to get your resume selected

  2 प्रोफेशनल समरी


  सगळ्यात पहिली तुमची प्रोफेशनल समरी लिहा. यात तुम्ही आतापर्यंत काय केले हे सांगू शकता. प्रोफेशनल समरीत तुमच्या पेशाशी निगडित बाबी लिहिलेल्या असाव्यात. तुम्ही काय केले याची माहिती दिलेली असावी. हे तुम्ही 5 ते 6 ओळीत लिहिलेले असावे. 

   

  3 विशेष योग्‍यता लिहा
  तुम्ही काय काम करु शकते हे लिहा. लक्षात ठेवा की हे तुमच्या पेशाशी निगडित असावे. तुम्ही पॉईंटनुसार लिहू शकता की तुम्ही काय काम जाणता. पॉईंट खूप असू शकतात त्यामुळे तुम्ही ते दोन ते तीन ओळीत किंवा तीन कॉलममध्ये लिहा. 

   

  4 कामाचा ताजा अनुभव
  - तुमच्या पात्रतेनंतर तुम्ही तुमचा ताजा कामाचा अनुभव लिहू शकता. एम्पॉयरला या बाबीबद्दल उत्सुकता असते की, तुम्ही सध्या काय करत आहात आणि तुमचे सगळ्यात लेटेस्ट काम काय आहे. तुम्ही त्या बाबी विशेषत्वाने लिहा ज्या तुमच्या पुढील जॉबसाठी महत्वाच्या आहेत.

   

   

  पुढे वाचा...

 • how to get your resume selected

  4 निगडित बाबी


  कधी-कधी असे होते की तुम्ही ज्या जॉबसाठी अर्ज करत आहात तो जॉब आणि तुमचा अनुभव याचा मेळ बसत नाही. तुमचा ज्या कामाचा अनुभव आहे त्याच कामासाठी अर्ज करा. त्यामुळे तुम्हाला सहजरित्या जॉब मिळू शकतो.

   

  5 लहान बाबी
  तुम्ही करिअरच्या सुरवातीला अनेक लहान जॉब केलेले असतात. हे अनुभव तुमच्या रिझ्युममध्ये नमुद करु नका. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आणि रिझ्यूमची व्हॅल्यू वाढते.
   

Trending