Home | Business | Personal Finance | income tax rule in India

Income tax act नियमांचे तुम्ही पालन करता की नाही सांगेल तुमचे PAN

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 23, 2018, 02:24 PM IST

जर तुमच्याकडे PAN नंबर असेल तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्या टॅक्स प्रोफाईलची माहिती घेऊ शकते. याद्वारेच इन्कम ट

 • income tax rule in India

  नवी दिल्ली- जर तुमच्याकडे PAN नंबर असेल तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्या टॅक्स प्रोफाईलची माहिती घेऊ शकते. याद्वारेच इन्कम टॅक्स विभागाला समजू शकते की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता की नाही. जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असेल तर income tax act मध्ये असणाऱ्या सध्याच्या नियमांप्रमाणे तुम्हाला income tax return फाईल करणे गरजेचे आहे.

  इन्कम टॅक्स विभाग अशी माहिती घेतो तुमच्या टॅक्स प्रोफाईलची
  cleartax च्या मुख्य संपादक आणि सीए प्रिती खुराणा म्हणाल्या की, इन्कम टॅक्स विभाग पॅनद्वारे तुमचा टॅक्स प्रोफाईल चेक करु शकता. याद्वारे विभाग माहिती मिळवू शकतो की तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करत आहात की नाही. याद्वारे इन्कम टॅक्स तुमच्या मोठ्या व्यवहारांवरही लक्ष ठेवत असतो.

  कार खरेदी किंवा विक्री केल्यावर
  तुम्ही कार खरेदी किंवा विक्री करत असाल तर तुमच्याकडे पॅन नंबर असणे गरजेचे आहे. तुमच्या पॅन डिटेलद्वारे सरकारला हे समजू शकते की तुम्ही कार खरेदी केली आहे किंवा विक्री केली आहे. तुमच्या पॅन नंबरद्वारे सरकार हे सुध्दा जाणून घेत असते की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे की नाही. विभाग तुम्हाला याबाबत विचारणाही करु शकतो.

  10 लाख रुपयांहून अधिकची संपत्ती खरेदी किंवा विक्री केल्यावर
  नव्या नियमानुसार तुम्ही 10 लाख रुपयांहून अधिकची स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास तुम्ही पॅन नंबर देणे गरजेचे आहे. सरकारला हे समजू शकते की तुम्ही 10 लाख रुपयांहून अधिकची प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री केली आहे.

  क्रेडिट कार्डने खरेदी
  तुम्ही एका वर्षात क्रेडिट कार्डाद्वारे 1 लाख रुपयांहून अधिकची खरेदी केल्यास त्याची माहिती सरकारपर्यंत पोहचते. सरकार तुम्हाला तुमचे वार्षिक उत्पन्न विचारु शकते.

  50,000 रुपयांहून अधिकचे हॉटेलचे किंवा रेस्टॉरंटचे बिल
  जर तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे 50,000 रुपयांहून अधिकचे बिल भरणार असाल तर तुम्हाला पॅन डिटेल देणे गरजेचे आहे. हा व्यवहार सरकारच्या लक्षात आल्यास सरकार तुम्हाला विचारणा करु शकते.

  50,000 रुपयांहून अधिकची म्युचुअल फंडात गुंतवणूक
  जर तुम्ही एकाच वेळी 50,000 रुपयांहून अधिकची म्युचुअल फंडात गुंतवणूक केली तर तुम्हाला पॅन डिटेल द्याव्या लागतील. तुमच्या पॅनमुळे सरकारला हे समजते की तुम्ही म्‍युचुअल फंडात गुंतवणूक केली आहे.

Trending