Home | Business | Personal Finance | investment plan for 1 crore

25 वर्षात करोडपती होण्यासाठी दरमहा करा 1650 रुपयांची गुंतवणूक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 24, 2018, 04:41 PM IST

जेवढ्या लहान वयात तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल तेवढा तुम्हाला अधिक फायदा होईल. हा गुंतवणूकीचा अतिशय स

  • investment plan for 1 crore

    नवी दिल्ली- जेवढ्या लहान वयात तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल तेवढा तुम्हाला अधिक फायदा होईल. हा गुंतवणूकीचा अतिशय साधा सिध्दांत आहे. तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी दरमहा 1650 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी एक कोटी रुपये मिळू शकतात. तर तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी गुंतवणूकीस सुरुवात केली तर तुम्हाला दरमहा 8,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

    1650 रुपयांची गुंतवणूक करुन कसे होऊ शकता करोडपती
    पैसा बाजार डॉट कॉमच्या माहितीनुसार तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी SIP मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला 12 टक्का व्याजदराने वयाच्या 60 व्या वर्षी एक कोटी रुपये मिळतील. तर 35 व्या वर्षी तुम्हाला दरमहा 8,000 रुपये गुंतवावे लागतात. याला कारण चक्रवाढ व्याजदराचा फायदा हे आहे. दहा वर्षात गुंतवणूकीत मोठे अंतर पडते.

Trending