आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 11 वर्षात 1 लाखाचे बनवले 92 लाख, इनरवेअर विकुन भारतात जमावला धाक Investors Rs 1 Lakh Turned Into 92 Lakhs In 11 Year Here Is Inner Secret To Success

11 वर्षात 1 लाखाचे बनवले 92 लाख, इनरवेअर विकुन भारतात जमावला धाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जॉकी इनरवेअरचे नाव तुम्ही नक्की ऐकले असेल पण भारतात या कंपनीविषयी कमीच माहिती आहे. भारतात याचे उत्पादन, विपणन आणि वितरण पेज इंडस्ट्रीज ही कंपनी करते. अशा रितीने कंपनीने जॉकी ब्रॅन्ड देशात लोकप्रिय केला. अशाच रितीने कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांनाही मोठा नफा मिळवून दिला आहे. केवळ 11 वर्षात या कंपनीत गुंतवणूक केलेल्यांना एका लाखाचे 92 लाख रुपये मिळाले आहेत. इनरवेअर विकुन कंपनीने भारतात आपला शिक्का जमावला आहे. चला जाणून घेऊ यात कुठे आणि कधी कंपनीची सुरुवात झाली.

 

 

1994 मध्ये पेज इंडस्ट्रीजची सुरुवात
पेज इंडस्ट्रीजच्या स्थापनेची गोष्ट अशी आहे. फिलिपिन्सच्या मनिलात जन्म झालेले सुंदर जेनोमल हे 1994 मध्ये भारतात आले होते. बंगळुरुमध्ये शिफ्ट झालेल्या बहिणीकडे ते त्यावेळी आले होते. ते त्याचवेळी भारतात व्यवसायाच्या संधीही शोधत होते. सुंदर यांना भारतीय बाजारात असलेल्या संधी दिसल्या. त्यांनी येथे जॉकी इनरवेअरचे डिस्ट्रीब्यूशन सुरु केले. यापूर्वी त्यांनी फिलिपिन्समध्ये जॉकीसोबत बिझनेस सुरु केला होता. भारतात बिझनेस सुरु केल्यानंतर 4 वर्षातच त्यांची कंपनी प्रॉफिटमध्ये आली.

 

 

2007 मध्ये IPO द्वारे बाजारात प्रवेश
फेब्रुवारी 2007 मध्ये इंडस्ट्रीजचा IPO  बाजारात आला. त्याची किंमत 360 ते 395 रुपये होती. 16 मार्च 2007 ला पेज इंडस्ट्रीजचा शेअर बीएसईवर 341.90 रुपये आणि एनएसईवर 329 रुपयांवर लिस्ट झाला. तो नंतर 282.10 रुपयांवर बंद झाला होता.

 


31 डिसेंबर 2040 पर्यंत करार

पेज इंडस्ट्रीजने जॉकी इंटरनॅशनलसोबत आपला करार वाढवला आहे. जॉकी इंटरनॅशनलसोबत हा करार 31 डिसेंबर 2040 पर्यंत आहे. नव्या करारात कोणतीही नवी अट जोडण्यात आलेली नाही. रॉयल्टी एकुण विक्रीच्या 5 टक्के आहे. प्रमोटरची हिश्श्याबाबत कोणतीही शर्त जोडण्यात आलेली नाही. भारतासह  श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि यूएई देशांसाठी कंपनीकडे जॉकी इनरवेअरच्या उत्पादन, विपणन आणि वितरणाचे हक्क आहेत. कंपनीने यूएईत जॉकी एक्सक्लूसिव्ह ब्रॅण्डचे 4 आणि श्रीलंकेत 2 आउटलेट उघडले आहेत. 

 


11 वर्षात एक लाख बनले 92 लाख
पेज इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांनाही चांगला फायदा दिला आहे. 16 मार्च 2007 ला बीएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव 282.10 रुपये होता. 13 जून 2018 ला तो 26,295.95 रुपयांवर पोहचला होता. 11 वर्षात शेअरमध्ये 9221.50 टक्के तेजी आली. म्हणजेच गुंतवणुकदारांनी शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर ते 11 वर्षात 92 लाख रुपये झाले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...