आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5000 रुपयांच्या Security Deposit वर घेऊ शकता पोस्‍टाची फ्रेंचायसी, मिळेल नियमित उत्पन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात 1.55 लाख पोस्‍ट ऑफिस आहेत. त्यापैकी 89 टक्के ग्रामीण भागात आहेत. एवढे असूनही अनेक ठिकाणी अजुनही पोस्ट ऑफिसची गरज आहे. ही गरज ओळखून पोस्ट विभागाने लोकांना पोस्ट ऑफिस फ्रेंचायसी देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ 5000 रुपयांचे किमान सिक्‍युरिटी डिपॉझिट भरुन तुम्ही ही फ्रेंचायसी घेऊ शकता.

 

 

इंडिया पोस्ट फ्रेंचायसी स्कीम अंतर्गत पोस्ट ऑफिसची काउंटर सर्विस पोस्ट ऑफिसच्या बाहेर उपलब्ध होणार आहे. या फ्रेंचायसीच्या वस्तूंची डिलिव्हरी आणि ट्रान्समिशन पोस्ट विभागच करतो. या स्कीम अंतर्गत लोकांपर्यंत पोस्ट ऑफिसची सेवा आणि प्रॉडक्टस पोहचतात. फ्रेंचायसी घेणाऱ्यास या निमित्ताने चांगली कमाई करण्याची संधी मिळते. चला जाणून घेऊ या तुम्ही कशा पध्दतीने पोस्ट ऑफिसची फ्रेंचायसी घेऊ शकता आणि कोणत्या सर्विसवर किती कमिशन मिळते.

 

 

कोण घेऊ शकते फ्रेंचायसी...
- कोणतीही व्यक्ती, संस्था, दुकानदार आदी.
- नवी टाऊनशिप, स्पेशल इकोनॉमिक झोन, नव्याने सुरु होणारे इंडस्ट्रियल सेंटर, कॉलेज, पॉलिटेक्निक्‍स, विद्यापीठ, प्रोफेशनल कॉलेज आदी फ्रेंचायसीचे काम घेऊ शकतात. फ्रेंचायसी घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. सिलेक्ट झालेल्या व्यक्तींना डिपार्टमेंटसोबत एमओयू साईन करावे लागेल.
- व्यक्तीचे वय कमीत कमी 18 असावे.
- त्याने कमीत कमी 8 वी पास केलेली असावी.
- फॉर्म व अधिक माहिती https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.

 

 

कसे होईल सिलेक्शन
- फ्रेचायसी घेणाऱ्याची निवड संबंधित विभागीय प्रमुखाकडून करण्यात येते. ही निवड अर्ज मिळाल्यानंतर 14 दिवसांच्या आत ASP /sDl च्या अहवालाच्या आधारावर करण्यात येते. ही फ्रेंचायसी अशा ठिकाणी नाही मिळत जेथे पंचायत संचार सेवा योजनेअंतर्गत पंचायत संचार सेवा केंद्र आहे. 

 

 

कोण घेऊ शकत नाही फ्रेंचायसी...
- पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील व्यक्ती त्याच विभागात फ्रेंचायसी घेऊ शकत नाहीत. कुटूंबातील कर्मचाऱ्याची पत्नी, सगेसोयरे, सावत्र मुले, असे लोक जे या कर्मचाऱ्यावर अवलंबून आहेत ते फ्रेंचायसी घेऊ शकतात.

 

 

किती सिक्यूरिटी डिपॉझिट
- पोस्ट ऑफिस फ्रेंचायसी देण्यासाठी  5000 रुपये एवढे कमीत कमी सिक्यूरिटी डिपॉझिट आहे. हे फ्रेंचायसीद्वारे एक दिवसात केल्या जाणाऱ्या जास्तीत आर्थिक व्यवहारावर आधारित आहे. नंतर ते सरासरी दैनिक महसूलाच्या आधारावर वाढते. सिक्यूरिटी डिपॉझिट NSC स्वरुपात घेतले जाते.

 

 

पुढे वाचा: कोणत्या सेवा आणि प्रोडक्ट उपलब्ध

 

बातम्या आणखी आहेत...