Home | Business | Personal Finance | know how you can make 2 crore by only 500 rs investment

500 रुपयांची गुंतवणूक करुनही तुम्ही उभारु शकता 2 कोटी रुपये, असे करा प्लॅनिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 26, 2018, 12:39 PM IST

जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या सध्याच्या उत्पन्नातून कसे कोट्याधीश बनाल तर कदाचित तुमचे उ

 • know how you can make 2 crore by only 500 rs investment

  नवी दिल्ली- जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या सध्याच्या उत्पन्नातून कसे कोट्याधीश बनाल तर कदाचित तुमचे उत्तर असेल जास्तीत जास्त पैसे वाचवून. हे खूपच अवघड असल्याची तुम्हालाही कल्पना आसेल. पण आम्ही तुम्हाला एक पध्दत सांगत आहेत ज्याद्वारे तुम्ही दरमहा केवळ 500 गुंतवणूक करुन करोडपती बनू शकता. त्यासाठी तुम्हाला गुंतवणूकीची सुरुवात 500 रुपयांपासून करावी लागेल.


  कसा असेल तुमचा इन्वेस्टमेंट प्लॅन
  बँक बाजार डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांच्या मते हा गुंतवणूकीचा प्लॅन खूपच सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला दरमहा 500 रुपये गुंतवावे लागतील. अशा रितीने तुम्ही पहिल्या वर्षी 6,000 रुपये गुंतवणूक कराल. त्यानंतर त्यात तुम्हाला दरवर्षी 20 टक्के वाढ करावी लागेल. म्हणजेच तुमची गुंतवणूक पुढील वर्षी 600 रुपये होईल. अशा रितीने दरवर्षी 20 टक्क्यांनी गुंतवणूक वाढविल्यास पाचव्या वर्षी तुमची गुंतवणूक 1036 रुपये दरमहा होईल. दहाव्या वर्षी ही गुंतवणूक दरमहा 2580 रुपये होईल.


  कुठे कराल गुंतवणूक
  तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत असाल तर इक्विटी म्यूचुअल फंडात गुंतवणूक करु शकता. क्रिसिल एएमएफआई इक्विटी फंड परफार्मेंस इंडेक्‍सनुसार एक इन्वेस्टमेंट कॅटेगरीनुसार इक्विटी म्‍यूचुअल फंडाने जून 2017 ला संपलेल्या 10 वर्षात 11.56 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.


  दीर्घकाळातील गुंतवणूकीचा तुम्हाला मिळेल असा फायदा
  दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्याने तुम्हाला कंपाउंडिंगचा फायदा मिळतो. कंपाउंडिंगचा अर्थ आहे की आपल्याला पहिल्या वर्षी गुंतवणूकीवर जो परतावा मिळतो तो परतावा आणि त्यानंतर परताव्याच्या रकमेसह तुम्ही करत असलेली गुंतवणूक यावर परतावा मिळतो. अशा रितीने मिळणाऱ्या या कंपाउंडिंगमुळे तुमचा पैसा वेगाने वाढतो.

  वर्ष
  10 टक्के रिटर्न
  12 टक्के रिटर्न
  15 टक्के रिटर्न
  वर्ष
  10 टक्के रिटर्न
  12 टक्के रिटर्न
  15 टक्के रिटर्न
  5 वर्ष
  52,669 रुपये
  54,448 रुपये
  57,236 रुपये
  10 वर्ष
  2,15,880 रुपये
  2,31,442 रुपये
  2,57,541 रुपये
  15 वर्ष
  6,73,786 रुपये
  7,45,009 रुपये
  8,72,395 रुपये
  20 वर्षे
  18,96,606 रुपये
  21,51,848 रुपये
  26,36,528 रुपये
  25 वर्ष
  50,73,691 रुपये
  58,79,711 रुपये
  74,97,272 रुपये
  30 वर्ष
  1,31,95, 615 रुपये
  1,55,56,229 रुपये
  2,05,39,745 रुपये


  पुढे वाचा: म्‍यूचुअल फंड देत नाही कोणत्या गोष्टीची गॅरिटी

 • know how you can make 2 crore by only 500 rs investment

Trending