आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIC ची ही योजना तुम्हाला देते दरमहा 5 हजारापेक्षा अधिकच्या निश्चित उत्पन्नाची खात्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हाला एकदाच गुंतवणूक करुन दरमहा निश्चित उत्पन्नाची खात्री हवी असेल तर एलआयसीची जीवन अक्षय VI पॉलि‍सी तुमच्यासाठी निश्चितच एक चांगला पर्याय आहे. या योजनेचा फायदा तुमच्या पत्नीलाही मिळेल. या अंतर्गत तुम्ही एकदाच दहा लाखाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 65,500 रुपये दरवर्षी मिळतील म्हणजेच तुम्हाला दरमहा 5000 रुपयापेक्षा अधिक उत्पन्न मिळेल. 

 


काय आहे नियम
एलआयसीच्या विमा सल्लागार बंटी गुप्ता यांनी सांगितले की, या योजनेत 30 वर्षे ते 85 वर्षादरम्यानचे लोक गुंतवणूक करु शकतात. यात तुम्ही कमीत कमी एक लाखाची गुंतवणूकही करु शकता. तर जास्तीत जास्त गुंतवणूकीची कोणतीही सीमा नाही. 

 


पत्नीलाही मिळेल उत्पन्न
पॉलिसी धारक जीवंत असे पर्यंत दरमहा त्याला रक्कम मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस 100 टक्के पेन्शन मिळेल. तुमच्या पत्नीच्या मृत्यूनंतर हे उत्पन्न बंद होईल. तर नॉमिनीला तुम्ही गुंतवलेली रक्कम परत करण्यात येईल. 

 

 

पुढे वाचा: कोणत्या वयात मिळेल किती पेन्शन...

बातम्या आणखी आहेत...