आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीसाठी बेस्ट आहेत या भारतीय कंपन्या, तुम्हीही करु शकता प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जेव्हा तुम्ही कोणत्या कंपनीत काम करण्यास उत्सुक असता तेव्हा तुमची सगळ्यात पहिली नजर पडते ती ब्रॅण्ड आणि सॅलरीवर. जर कंपनीत काम करण्याचे वातावरण चांगले असेल आणि ब्रॅण्ड मोठा असेल तर लोक त्याकडे सहज आकर्षित होतात. त्यामुळेच सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट जगभरातील लोकांसाठी सगळ्यात आकर्षक आणि आवडता ब्रॅण्ड आहे. ही माहिती रेंडस्टॅण्ड इम्प्लॉयर ब्रॅण्ड रिसर्च (REBR) 2018 च्या अहवालात देण्यात आली आहे. यासोबत रिसर्चमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या आवडत्या कंपन्यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊ या भारतातील कोणत्या कंपन्या या यादीत आहेत. 

 

 

या कंपन्या आहेत भारतीयांच्या आवडत्या 
भारतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या भारतीयांच्या आवडत्या आहेत. या हिंदुस्तान युनिलिव्हर, IBM इंडिया, ITC ग्रुप, एल अॅण्ड टी, मर्सीडिज बेंझ इंडिया, सॅमसंग इंडिया, सोनी इंडिया आणि टाटा कन्सल्‍टन्सी सर्विसेसचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना या कंपन्यामध्ये काम करण्यास आवडते. तुम्ही बेरोजगार असाल आणि तुमची पात्रता असेल तर तुम्ही या कंपन्यांमध्ये प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही. 

 

 

इंफ्रामध्ये एल अॅण्ड टी आणि एफएमसीजीमध्ये एचयूएल
सेक्टरप्रमाणे पाहिल्यास TCS आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सगळ्यात आवडता ब्रॅन्ड आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात लार्सन अॅण्ड टूब्रो हा आवडता ब्रॅन्ड आहे. तर एफएमसीजी सेक्टरमध्ये हिंदुस्तान युनीलिव्हरने बाजी मारली आहे.

 

 

उमेदवारांकडे पहिल्यापेक्षा अधिक पर्याय
रेंडस्टॅण्ड इंडियाचे एमडी आणि सीईओ पॉल डयूपिस यांनी सांगितले की, एम्प्लॉयर ब्रॅन्डिंग यापूर्वी कधीही इतके महत्वपुर्ण नव्हते. आता कर्मचाऱ्यांकडे पर्याय आहेत. आता तेच ठरवत आहेत की आपल्या क्षमतेप्रमाणे कुठे काम करायचे.

 

 

टॉप थ्रीमध्ये आयटी टॉपवर, ऑटमोटिव्ह दुसऱ्या क्रमाकांवर
सेक्टरप्रमाणे पाहिल्यास आयटीत 69 टक्के, ऑटोमोटिव्हमध्ये 68 टक्के आणि रिटेल व एफएमसीजीमध्ये 67 टक्के कंपन्या अशा आहेत ज्या कर्मचाऱ्यांबाबत जागरुक आहेत. त्यांच्या आवडीची दखल घेतात. 

 

 

पुढे वाचा: कर्मचाऱ्यांचा काय असतो फोकस

बातम्या आणखी आहेत...