आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल 5.75 तर डिझेल 3.75 रुपयांनी होऊ शकते स्वस्त, SBI ने सादर केला फार्मूला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यांनी बेस प्राईसवर व्हॅट लावल्यास पेट्रोल 5.75 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. तर डिझेल 3.75 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. आता कच्च्या तेलाच्या किंमतीचा विचार केला तर १९ राज्यांमध्ये 2018-19 या वर्षात 18,728 कोटी रुपयांचा नफा होणार आहे. या 19 राज्यांना केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून   2,675 कोटींचा अतिरिक्त कर मिळणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे राज्यांची चांगलीच कमाई होणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

 

राज्यांनी ठरवले तर राज्ये हा कर कमी करुन आपल्या राज्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देऊ शकतात. पण केंद्र सरकारला जाणाऱ्या कराबाबत काय? असा सवालही यामध्ये उपस्थित करण्यात आला आहे. याबरोबरच प्रत्येक राज्यात असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवरील व्हॅट हा पेट्रोल किंवा डिझेलच्या मूळ किंमतीवर आकारण्यात आल्यास राज्याप्रमाणे ही किंमत आणखी कमी होईल. यामध्ये केंद्राच्या करप्रणालीचा विचार न करता पेट्रोलच्या मूळ किंमतीवर व्हॅट आकारल्यास किंमत कमी होऊ शकते असे म्हटले आहे. तसे झाल्यास डिझेलची किंमत 3.75 रुपयांनी तर पेट्रोलची किंमत 5.75 रुपयांनी कमी होईल. अशा स्थितीमध्ये प्रत्येक राज्याला 34,627 कोटींची वित्तीय तूट सहन करावी लागेल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...