Home | Business | Personal Finance | PERS PFB UTLT sbi raise mclr

SBI सहित HDFC, PNB, ICICI बँकेचे कर्ज महागले, 0.10% वाढवले MCLR

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 02, 2018, 11:03 AM IST

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या आधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकांनी आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरा

 • PERS PFB UTLT sbi raise mclr

  नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या आधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकांनी आपल्या गृहकर्जाच्या एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. बॅंकानी आपल्या एमसीएलआरमध्ये 0.1 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे गृहकर्ज महाग झाले आहे शिवाय कर्जाचा हप्ताही वाढणार आहे.

  एमसीएलआर वाढविलेल्या बॅंकांमध्ये एसबीआय, पीएनबी आणि आयसीआयसीआय या बँकांचा समावेश आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवीसाठी 0.10 टक्के व्याजदर वाढविला आहे. स्टेट बँकेने मार्जिनल कॉस्टवर आधारित कर्ज दरांमध्ये (एमसीएलआर) 0.10 टक्के वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यामुळे स्टेट बँकेच्या नव्या ग्राहकांना कर्जांवर अधिक व्याज द्यावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जूनपासून करण्यात येणार असल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. स्टेट बँकेने चालू वर्षात दुसऱ्यांदा 'एमसीएलआर'मध्ये वाढ केली आहे. यापूर्वी बँकेने मार्च महिन्यात 'एमसीएलआर'मध्ये 0.2 टक्के वाढ केली होती. दोनच दिवसांपूर्वी स्टेट बँकेने निश्चित कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.

  एसबीआयने एक दिवस आणि एक महिना निधी सीमान्त खर्च आधारित कर्ज 7.8 टक्क्यांवरुन 7.9 टक्के केले आहे. तीन वर्षांच्या परिपक्वताच्या कालावधीसाठी कर्जासाठी व्याजदर 8.35 टक्के केला आहे. याच काळात पीएनबीने तीन वर्षे व पाच वर्षांसाठी अनुक्रमे 8.5 टक्के आणि 8.7 टक्के एमसीएलआर वाढविले आहे. पीएनबीने आधार दर 9.15 टक्क्यांवरून 9.25 टक्के केला.

  एसबीआयचे नवे एमसीएलआर

  कालावधी नवा एमसीएलआर (टक्के )
  ओवरनाइट 7.90
  एक महिना 7.90
  तीन महिने 7.95
  सहा महिने 8.10
  1 वर्ष 8.25
  2 वर्ष 8.35
  3 वर्ष 8.45

Trending