Home | Business | Personal Finance | personal loan interest rates in various banks

या 7 बॅंकांकडून मिळते स्वस्त, फास्ट पर्सनल लोन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 12, 2018, 04:55 PM IST

जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुमच्या समोर पर्सनल लोनचा पर्याय असतो. तुम्ही बॅंकांमार्फत हे कर्ज सहज मिळवू

 • personal loan interest rates in various banks

  नवी दिल्ली- जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुमच्या समोर पर्सनल लोनचा पर्याय असतो. तुम्ही बॅंकांमार्फत हे कर्ज सहज मिळवू शकता. काही बँकांकडून तुम्ही ऑनलाईन अर्ज करुनही कर्ज मिळवू शकता. ICICI बॅंकेकडून तुम्ही केवळ 3 सेकंदात कर्ज घेऊ शकता.

  यूनियन बॅंक ऑफ इंडिया, SBI, PNB, ICICI बॅंक, HDFC या बँकांनी मार्जिकल कॉस्टवर आधारित लॅंडिंग रेट म्हणजे MCLR मध्ये 0.1 टक्के वाढ केली होती. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणती बँक तुम्हाला कमी व्याजात आणि वेगाने वैयक्तिक कर्ज देते.

  यूनियन बॅंक ऑफ इंडिया
  यूनियन बॅंक ऑफ इंडिया तुम्हाला 5 लाख ते 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देते. येथे व्याजदर वेगवेगळे 10.35 ते 14.40 टक्के आहे. येथे कर्जफेडीची जास्तीत जास्त 5 वर्ष आहे.

  सोर्स- https://www.unionbankofindia.co.in/pdf/ROIsonRetailLoans.pdf

  ICICI बॅंक
  ICICI बॅंक तुम्हाला लग्न, हॉलिडे, घराचे नुतनीकरण, टॉप अप आदी कारणासाठी वैयक्तिक कर्ज देते. तेथे तुम्ही 20 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. येथे व्याजदर 10.99% ते 22% आहे. ही बँक अवघ्या 3 सेकंदात अमाउंट तुमच्या अकाउंटवर ट्रान्‍सफर करते. तुम्ही हे कर्ज 1 ते 5 वर्षात फेडू शकता.

  सोर्स- https://www.icicibank.com/Personal-Banking/loans/personal-loan/index.page?#

  कोटक महिन्‍द्रा बॅंक
  ही बॅंक तुम्हाला 50000 ते 15 लाख रुपयांचे कर्ज देते. याचा व्याजदर 10.99% ते 24% असतो.

  सोर्स- https://www.kotak.com/en/personal-banking/loans/personal-loan/fees-and-charges.html

  पुढे वाचा: अन्य बँक

 • personal loan interest rates in various banks

  इंडसइंड बॅंक


  इंडसइंड बॅंक 11.25 ते 23 टक्के व्याजदरावर पर्सनल लोन देते. या कर्जाची परतफेड तुम्ही 1 ते 5 वर्ष या कालावधीत करु शकता. कर्जासाठी तुम्ही डोअरस्टेप बॅंकिंग सुविधाही घेऊ शकता.

   

  सोर्स- https://www.indusind.com/personal-banking/products/loans/personal-loan.html

   

  पुढे वाचा: SBI चा रेट

 • personal loan interest rates in various banks

  SBI


  SBI च्या पर्सनल लोनचा व्याजदर 11.15 ते 15.15% वार्षिक आहे. एसबीआयकडून तुम्ही 10 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेऊ शकता.

   

  सोर्स- https://www.sbi.co.in/portal/web/interest-rates/other-schemes

   

  पुढे वाचा: बँक ऑफ इंडियाचा काय आहे रेट

 • personal loan interest rates in various banks

  बँक ऑफ इंडिया


  बँक ऑफ इंडिया तुम्हाला 11.9 ते 13.9 टक्क्यांनी पर्सनल लोन देते. तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. या कर्जाची परतफेड तुम्ही 5 वर्षात करु शकता. 

   

  सोर्स-https://www.bankofindia.co.in/english/retail_credit.aspx


  पुढे वाचा: बंधन बँक

 • personal loan interest rates in various banks

  बंधन बँक


  बंधन बँकेकडून तुम्ही 1 लाख ते 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज दोन दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकते. येथे पर्सनल लोनसाठी व्याजदर 14 ते 17.86 टक्के वार्षिक आहे. हे कर्ज तुम्ही एक ते तीन वर्षात परत करु शकता.
   

Trending