आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

25 कोटीत या कंपनीला मिळाला लाल किल्ला; झाली ऐतिहासिक डील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आपण जेव्हा देशाच्या ऐतिहासिक वास्तूंचा विचार करतो तेव्हा लाल किल्ल्याचा उल्लेख निश्चितच होतो. आता हाच लालकिल्ला दालमिया ग्रुपच्या ताब्यात जाणार आहे. ही डील 25 कोटी रुपयात झाली आहे. या ऐतिहासिक स्मारकास या समुहाने दत्तक घेतले आहे. चला जाणून घेऊ या का झाली ही डील

 

 

या कंपन्यांना टाकले मागे
माध्यमातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दालमिया समुहाने हे कंत्राट इंडिगो एअरलाईन्स आणि जीएमआर समुहाला मागे टाकत मिळवले आहे. हे कंत्राट ऐतिहासिक स्मारके दत्तक देण्याच्या योजनेचा म्हणजेच 'एडॉप्ट ए हेरिटेज' योजनेचा हिस्सा आहे.

 

 

23 मे पासून काम सुरू
दालमिया समुह 23 मे पासून या कामाच्या प्रक्रियेत सक्रीय होईल. यानुसार ते लाल किल्ल्याचा विकास करणार आहेत. पण 15 ऑगस्ट पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणापुर्वी दालमिया समुहाला लालकिल्ला पुन्हा एकदा सुरक्षा दलांच्या ताब्यात द्यावा लागेल. त्यानंतर हा समुह पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेईल.

 

 

9 एप्रिल रोजी झाली होती डील
लाल किल्ला कंत्राटावरुन दालमिया भारत ग्रुप, टुरिझम मिनिस्ट्री, पुरातत्व विभागादरम्यान 9 एप्रिल रोजी डील झाली. कंत्राटानुसार या समुहाला सहा महिन्यात लाल किल्ल्यात बेसिक सुविधा द्याव्या लागतील.

 

 

पुढे वाचा: कंपनीला काय-काय करावे लागेल

बातम्या आणखी आहेत...