आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

50 कोटी भारतीयांचे उघडणार विश्‍वकर्मा अकाउंट, पेन्शनसहीत मिळतील हे 10 फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकारने 50 कोटी कामगारांना प्रॉव्हिडंट फंड, पेन्शनसहित सामाजिक सुरक्षा देण्यासाठी युनिवर्सल सोशल सिक्युरिटी स्कीम तयार केली आहे. या योजनेतंर्गत सरकार 50 विश्‍वकर्मा अकाउंट उघडणार आहे. या अकाउंटच्या माध्यमातून 50 कोटी लोकांना पीएफ पेन्शनसहित 10 हून अधिक सामाजिक सुरक्षेचे फायदे मिळणार आहेत. या योजनेतंर्गत कोणतेही काम करणाऱ्या जवळपास प्रत्येक भारतीयास सामाजिक सुरक्षा मिळणार आहे. या पुढील काळात जवळपास सर्व कामगारांना पीएफ आणि पेन्शनची सुविधा मिळणार आहे. मोदी सरकारने या योजनेचा ड्राफ्ट तयार केला आहे. पुढील महिन्यात या योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व विभागाची एक बैठक होणार असून यातील सर्व पैलुंवर चर्चा करण्यात येणार आहे. 

 

 

कसे उघडेल विश्‍वकर्मा अकाउंट
या योजनेतंर्गत तुम्ही काम करत असलेल्या कंपनी किंवा संस्थेला एका ठराविक कालावधीच्य आत तुमचे सामाजिक सुरक्षेसाठीचे विश्‍वकर्मा खाते उघडावे लागणार आहे. कंपनीने अथवा संस्थेने तुमचे खाते न उघडल्यास तुम्हीही हे खाते उघडू शकता. त्यासाठी सरकार व्यवस्थाही उभारणार आहे. तुम्ही केवळ एकटे काम करत असाल तरी तुम्ही तुमचे स्वत:चे खात उघडू शकता. तुम्ही देशाच्या कोणत्या भागात असाल तरी हे खाते ऑपरेट करु शकता. उदाहरणार्थ तुम्ही दिल्लीत काम करत आहात पण तुम्ही ते सोडले आणि पश्चिम बंगालमध्ये गेलात तरी तुम्ही ते खाते ऑपरेट करु शकता.  

 

 

कामगारांची असेल वर्गवारी
सरकार या कामगारांची वर्गवारी देखील करणार आहे. यात तुम्ही तर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांमधील असाल तर तुम्हाला यात कोणतेही योगदान द्यावे लागणार नाही. तुमच्या पीएफ, पेन्शनसह दुसऱ्या सर्व सामाजिक सुरक्षेसाठी सरकार योगदान देईल. तर ज्यांची योगदान देण्याची क्षमता असेल त्यांच्या पगारातून सुमारे 12.5 तर 20 टक्के कपात करण्यात येईल.

 

 

पुढे वाचा: कोणाला मिळणार 10 फायदे

बातम्या आणखी आहेत...