Home | Business | Personal Finance | tax planing for 2018 19

7.5 लाखाच्या उत्पन्नावर पडेल 0 टॅक्स, असे करा Planning

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 12, 2018, 07:18 PM IST

इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये 2018 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जर तुम्ही गुंतवणूकीच्या साधनांचा योग्

 • tax planing for 2018 19

  नवी दिल्ली- इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये 2018 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जर तुम्ही गुंतवणूकीच्या साधनांचा योग्य वापर केला तर तुम्हाला 7.5 लाख रुपयाच्या उत्पन्नावरही कोणता कर भरावा लागणार नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्हाला 7.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कसा कर पडणार नाही. आर्थिक वर्ष 2018- 19 चे टॅक्स प्लॅनिंग करताना हे कॅलक्युलेशन तुम्हाला मदत करेल.

  3 लाख रुपयाच्या उत्पन्नावर कोणताही नाही कर
  - Cleartax चे मुख्य संपादक आणि सीए प्रिती खुराणा यांनी सांगितले की, वार्षिक 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 5% टॅक्स द्यावा लागेल.
  - 2.5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. म्हणजेच 3 लाखाचे उत्पन्न असणाऱ्यास केवळ 50 हजार रुपयांवर टॅक्स द्यावा लागणार आहे.
  - 5 टक्के टॅक्स रेट अनुसार तुमची टॅक्स लायबिलिटी अडीच हजार रुपये होते. 3.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 2.5 हजार रुपयांची सूट मिळू शकते. तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये असल्यास तुम्हाला शुन्य टॅक्स द्यावा लागेल.

  80C अंतर्गत 1.5 लाख रुपयाच्या गुंतवणूकीवर टॅक्स सूट
  - तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर टॅक्स सूट मिळवू शकता.
  - 80C अंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, लाईफ इंन्शुरन्स आणि मेडिक्लमवर 1.5 लाख रुपये गुंतवणुक करु शकता.

  एनपीएसमध्ये 50 हजार इन्वेस्टमेंटवर टॅक्स सूट
  - न्‍यू पेंशन सिस्‍टम म्हणजे एनपीएसमध्ये 50 हजार रुपयांच्या अतिरिक्‍त इन्वेस्टमेंटवर तुम्हाला टॅक्स सूट मिळू शकते.

  2.5 लाख रुपयांच्या होम लोन इंटरेस्टवर टॅक्स सूट
  - तुम्ही जर गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला होम लोनच्या इंटरेस्टवर 2 लाखापर्यंत कर सवलत मिळू शकते. त्यासाठी तुम्हाल पजेशन मिळालेली असणे गरजेचे आहे.
  - तुम्ही पहिल्यांदा घर घेतले असेल तर तुम्हाला अडीच लाख रुपयांच्या इंटरेस्टवर टॅक्स सूट मिळू शकते.

Trending