Home | Business | Personal Finance | useful tips for credit card users

क्रेडिट कार्डाचा वापर करताना लक्षात ठेवा या 5 गोष्टी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 30, 2018, 12:01 AM IST

अनेकदा असे होते की आपल्याला पैशाची गरज असते पण आपल्या बॅंक खात्यावर तेवढे पैसे नसतात. अशावेळी क्रेडिट कार्ड

 • useful tips for credit card users

  नवी दिल्ली- अनेकदा असे होते की आपल्याला पैशाची गरज असते पण आपल्या बॅंक खात्यावर तेवढे पैसे नसतात. अशावेळी क्रेडिट कार्ड आपल्या उपयोगी पडते. याद्वारे तुम्ही गरजेच्या वेळी पैसे वापरु शकता. नंतर ठरलेल्या वेळेपुर्वी तुम्ही पैसे परत करता. आता क्रेडिट कार्डाचा वापर वाढू लागला आहे. अशा वेळी काही बाकी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  कोणतेही काम पहिल्यांदा करताना आपल्या मनात काहीशी भिती असते आणि आपली चूक होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते. क्रेडिट कार्डलाही ही बाब लागू होते. त्यामुळेच क्रेडिट कार्डाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.


  क्रेडिट इनफॉरमेशन कंपनी सिबिलचे चीफचे ऑपरेटिंग ऑफिसर हर्षाला चंडोरकर याबाबतची माहिती देत आहेत.

  1. जाणून घ्या डिटेल्‍स
  क्रेडिट कार्ड घेताना आवश्यक डिटेल्स जसे की व्याजदर, क्रेडिट परत करण्याचा कालावधी, शुल्क आदीविषयी माहिती घ्या. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड घेताना तुम्ही व्याजदराविषयी चर्चा करु शकता पण अनेकांना याची माहिती नसते. त्यामुळे क्रेडिट कार्डासाठी अर्ज करतानाच याविषयी माहिती करुन घ्या.

  2. वेळेवर परत करा बिल
  दरमहा आपल्या क्रेडिट कार्डाचे बिल वेळेवर भरा. यामुळे तुम्ही टेन्शनपासूनही दूर राहाल. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोरही चांगला राहील.

  पुढे वाचा: आणखी काय आहेत टिप्स..

 • useful tips for credit card users

  3. अनेक क्रेडिट कार्ड घेण्याचे टाळा


  तुम्ही अनेक क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल तर तसे करण्याचे टाळा. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डासाठी अर्ज करता तेव्हा ते क्रेडिट रिपोर्टच्या इन्क्वायरी सेक्शनमध्ये ते दिसते. जास्त प्रमाणात केलेले क्रेडिट कार्ड अर्ज तुमच्याबाबतच्या अर्जावर नकारात्मक प्रभाव टाकतात. याशिवाय अनेक क्रेडिट कार्ड मॅनेजही अवघड होते. तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरणे विसरण्याची शक्यताही त्यामुळे वाढते.

   

  पुढे वाचा: लिमिटपर्यंत होऊ देऊ नका खर्च

 • useful tips for credit card users

  4. लिमिटपर्यंत होऊ देऊ नका खर्च


  क्रेडिट कार्डाची पूर्ण मर्यादा कधीच वापरु नका. अशा रितीने खर्च करा की तो लिमिट म्हणजेच मर्यादेपर्यंत पोहचणार नाही. लिमिटपर्यंत खर्च केल्यावर तुमच्यावर क्रेडिट चुकविण्याचा बोजा वाढतो. याशिवाय तुम्हाला अधिक खर्च करण्याची सवयही लागते. शिवाय वेळेवर पेमेंट न केल्याने क्रेडिट स्कोरवर नकारात्मक प्रभाव पडतो.

   

  पुढे वाचा: सिबिल स्कोर आणि अहवालाची घ्या काळजी

 • useful tips for credit card users

  5. सिबिल स्‍कोर आणि रिपोर्ट करा अॅक्‍सेस


  तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे, त्यात काय आहे याची माहिती असल्याने तुम्ही तुमचा फायनान्स योग्य रितीने मॅनेज करु शकता. याशिवाय रिपोर्टमध्ये चुकीची माहिती जात असल्यास त्याचीही माहिती होईल.

   

Trending