आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ITR: का केला पाहिजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, 31 जुलै अंतिम तारीख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरण पत्र (आयटी रिटर्न्स) भरण्यासाठी अर्ज जारी केले आहेत. तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर तुमच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे गरजेचे आहे.

 

 

तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरीही तुम्ही ITR फाईल करु शकता. पण असे करणे आवश्यक नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की ITR का फाईल केला पाहिजे आणि तसे नाही केल्यास तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल.

 

 

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ठोठावू शकतो दंड
- जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला ITR रिटर्न फाईल करावा लागेल. बँक बाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांच्या अनुसार तुम्ही ITR रिटर्न फाईल न केल्यास इन्कम टॅक्स डिपार्टमेंट उत्पन्न आणि टॅक्स प्रोफाईलची तपासणी करु शकते. तुम्ही दोषी असल्यात दंडही ठोठावला जाऊ शकतो. तुमच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो.

 

 

उत्पन्नाचा पुरावा
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार ITR फाईल करणे ही तुमची ड्यूटी आहे. यामुळे तुम्हाला सन्मान मिळतो आणि देशसेवेची संधीही. याशिवाय तुम्हाला उत्पन्नाचा पुरावाही मिळतो. सर्व सरकारी आणि खासगी संस्था उत्पन्नाचा पुरावा म्हणून याचा स्वीकार करतात. तुम्ही बँक लोनसाठी अर्ज केल्यावरही बँक तुम्हाला ITR मांगते. तुम्ही नियमित ITR भरत असल्यास तुम्हाला कर्जही सहज मिळते. तु्म्हाला इतर आर्थिक सेवाही सहज उपलब्ध होतात. तुम्ही ITR फाईल करत नसाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

 

 

जास्त टॅक्स भरल्यास रिफंड प्राप्त करण्यासाठी ITR गरजेचा
बँक बाजार डॉ़ट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी म्हणाले की, ITR फाइल करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तुम्ही जर जास्त टॅक्स दिला असेल तर तो तुम्हाला व्याजासह परत मिळतो. ITR फाइल केल्याशिवाय तु्म्ही रिफंडसाठी क्लेम करु शकत नाही. तुमचे उत्पन्न करपात्र असल्यास तुम्ही रिटर्न फाईल करणे गरजेचे आहे.

 

 

व्हिसासाठी गरजेचे
तुम्ही दुसऱ्या देशात जाणार असाल आणि व्हिसासाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे आयटीआर असणे गरजेचे आहे. अनेक देशात तुमच्याकडे 3 ते 5 वर्षाचा आयटीआर मागितला जातो. 

 

 

पुढे वाचा: आणखी काय आहेत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...