Home | Business | Personal Finance | you can withdraw 75pc of your pf after 30 days of job loss

नोकरी सोडल्यावर 30 दिवसानंतर काढू शकता PF ची 75% रक्कम, अकाउंट राहिल सुरुच

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 27, 2018, 04:32 PM IST

तुम्ही नोकरी सोडली असेल आणि तुम्हाला मोठ्या रकमेची गरज असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता नोकरी स

 • you can withdraw 75pc of your pf after 30 days of job loss

  नवी दिल्ली- तुम्ही नोकरी सोडली असेल आणि तुम्हाला मोठ्या रकमेची गरज असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता नोकरी सोडल्यानंतर एक महिन्याने तुम्ही PF ची 75% रक्कम काढू शकता. तुम्ही हे पैसा काढल्यावरही तुमचे पीएफ अकाउंट सुरुच राहिल. एम्प्लॉईज प्रोव्हिडंड फंड ऑर्गनायझेशनच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ट्रस्टींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  2 महिन्यानंतर मिळत होते पैसे
  आतापर्यंत बेरोजगार झाल्यानंतर दोन महिन्यानंतर पुर्ण पैसे काढता येत होते. त्यानंतर तुमचे पीएफ अकाउंट बंद होत होते. म्हणजेच तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जॉईन केल्यावर तुमचे नवे अकाउंट उघडण्यात येत होते. पण आता नवी नोकरी मिळाल्यावरही तुमचे जुने अकाउंट सुरु राहणार आहे.

  2 महिन्यानंतर मिळू शकते उर्वरित 25 टक्के रक्कम
  जर तुम्ही नोकरी गेली असेल आणि तुम्हाला पीएफ अकाउंट बंद करायचे असेल तर फायनल सेटलमंट करुन तुम्हाला उर्वरित 25 टक्के रक्कमही काढता येईल. याबाबतचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

  60 टक्क्यांचा होता प्रस्ताव
  पहिल्यांदा असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता की बेरोजगार झाल्यावर एक महिन्यानंतर 60 टक्के रक्कम काढण्याची परवानगी देण्यात यावी. पण सीबीटीने ही लिमिट वाढवून 75 टक्के केली आहे.Trending